शुभम सोनवणे, रतन दिवेकर  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Accident | भाचीच्या लग्नाहून परतताना दुचाकी झाडावर आदळून २ तरुणाचा जागीच मृत्यू

कन्नड तालुक्यातील बनशेद्रा येथे भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

Kannad Taluka Bike Accident

कन्नड : तालुक्यातील कन्नड–वैजापूर रस्त्यावर बनशेंद्रा–सिरजगाव दरम्यान दुचाकी लिंबाच्या झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दी. १२ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शुभम रमेश सोनवणे (वय २३) आणि रतन बाळू दिवेकर (वय २१, दोघेही रा. रेल–कनवकावती, ता. कन्नड) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, रतन गायकवाड यांच्या भाचीचा शिर्डी येथे रविवारी दी. ११ रात्री विवाह होता. हा विवाह आटोपून रतन दिवेकर व शुभम सोनवणे हे एम. एच. २० जी. टी. ७६२० या दुचाकीवरून कन्नड–वैजापूर रस्त्याने घरी परतत होते. बनशेंद्रा–सिरजगाव परिसरात दुचाकी अचानक रस्त्याखाली उतरून लिंबाच्या झाडाला जोरात धडकली आणि मोठा अपघात झाला.

मात्र हा अपघात नेमका रात्री कोणत्या वेळी झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताची माहिती मिळताच रेल–कनवकावतीचे माजी उपसरपंच संदीप मोरे, शबीर शेख, कुणाल सोनवणे, रवी शिंदे, संजय भालेराव, राजू वाघ, गोरख पवार, भैय्या बोर्डे, जयेश जाधव, गणेश डोंगरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा गीते (मोंतिगे) यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT