Chhatrapati Sambhajinagar Gold-Silver Rates
छत्रपती संभाजीनगर: साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि सोने खरेदीचा खास मुहूर्त असलेल्या दसरा सणाच्या पूर्वसंध्येला सोन्या-चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली.
जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर आता १ लाख २२ हजार ३५० प्रति १० ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचला. गेल्या काही सोन्या-चांदीचे दर सातत्याने नवनवीन उच्चांक गाठत आहे. मार्च २०२५ मध्ये जवळपास ८९ हजाराच्या आसपास असलेले सोने सात महिन्यात तब्बल ३३ हजाराने उसळी घेते ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्याने तब्बल १ लाख २२ हजार ३५० चा नवा उच्चांक गाठला.
छत्रपती संभाजीनगर येथील सराफा व्यापारी नंदकुमार जालनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.१ ऑक्टोबर), १,५०० रुपयांच्या मोठ्या वाढीसह २४ कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर आता १,२२,३५० वर पोहचला.
गतवर्षी दसऱ्याला सोन्याचा दर ७८ हजार रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्यात एक वर्षात तब्बल ४३ हजार रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर, चांदी दरानेही पुन्हा विक्रमी झेप घेतली आहे. एका दिवसात चांदी ३,८०० रुपयांच्या वाढीसह १ लाख ५३, २५० प्रतिकिलो या नव्या उच्चांकावर पोहोचली आहे. गतवर्षी दसऱ्याला चांदीचा दर ८०,००० रुपये प्रतिकिलो होता.