छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती बसस्थानकात चोरांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असून, गेल्या काही दिवसांत दागिने, मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शनिवारी (दि.३०) सकाळी दहाच्या सुमारास आणखी एका महिलेचे गर्दीचा फायदा घेऊन चोराने मंगळसूत्र लंपास केले.
फिर्यादी विष्णू त्रिंबक राऊत (२७, रा. सिल्लोड) हा आई लक्ष्मीबाई, शुभम सोबत नाशिक येथे घरी महालक्ष्मीचा कार्यक्रम असल्याने मध्यवर्ती निघाले होते. बसस्थानकात आल्यानंतर एसटीमध्ये चढत असताना चोराने गर्दीचा फायदा घेऊन विष्णूच्या आईच्या गळ्यातील सहा ग्रामचे मंगळसूत्र तोडून लंपास केले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.