Businessman Ladda bungalow robbery case one arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
बजाजनगर येथील आरोपी देविदास शिंदे उद्योजक संतोष लड्डन यांच्या बंगल्यात दरोडा टाकून कोट्यवधींचे सोने-चांदी लुटून नेल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी पाच आर-ोपींना अकरा दिवसांनंतर बेड्या ठोकून मुख्य सूत्रधाराचे एन्काउंटर केले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.३०) गुन्हे शाखेने लड्डा यांच्या बंगल्यातील ऐवजाची टीप देणाऱ्याला अटक केली. देवीदास नाना शिंदे (४५, रा. वडगाव कोल्हाटी, शिवाजीनगर, एमआयडीसी वाळूज) असे आरोपीचे नाव आहे. रेकीसाठी वापरलेली कार आणि मोपेडही जप्त केली. मात्र साडेपाच किलो सोन्यापैकी केवळ ३२ तोळेच अद्यापपर्यंत पोलिसांनी हस्तगत केले. उर्वरित सोने अद्यापही सापडलेले नाही.
उद्योजक लड्डा यांच्या बंगल्यातील दरोडा हा मराठवाड्यातील सर्वात मोठा दरोडा आहे. मुख्य सूत्रधार अमोल खोतकर गुन्हे शाखेचे एपीआय रविकांत गच्चे यांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये सोमवारी (दि. २६) मारल्या गेला. टोळीतील योगेश सुभाष हाजबे (३१, रा. गंगोत्री पार्क, वडगाव कोल्हाटी), सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (४५, रा. कुत्तरविहीर, अंबाजोगाई), सय्यद अझरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन (३७, रा. रांजणगाव शेणपुंजी), सोहेल जलील शेख (२२, रा. करबला वेस, अंबाजोगाई) आणि महेंद्र माधवराव बिडवे (३८, रा. साजापूर) यांना अटक केली. न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी दिली. आर ोपी अटकेत असतानाही गुन्हे शाखेला सोने-चांदी कुठे आहे हे शोधण्यात अपयश आले आहे. पाच दरोडेखोरांकडून केवळ ३२ तोळे सोने हस्तगत केले. सव्वापाच किलो सोने आणि ३२ किलो चांदी कुठे, याचे गौडबंगाल कायम आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, लड्डन यांच्या घरात १० कोटींची रक्कम एका जमीन व्यवहारासाठी ठेवल्याची माहिती शिंदेने खोतकर, हाजबेला दिली होती. त्यानंतर सर्वांनी मिळून दरोडा टाकून दहा कोटींची रोकड लुटून नेण्याचा प्लॅन केला. लड्डन परदेशी गेल्याचे शिंदेने हाजबेला सांगितले. त्यानंतर १५ मेच्या रात्री सहा जणांनी दरोडा टाकला. तेव्हा बंगल्यात त्यांना कॅश सापडली नाही.
त्यानंतर बंगल्यात शोधाशोध केल्यानंतर त्यांच्या हाती साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी लागली, असे बोलले जात आहे. मात्र रोख रक्कमही या दरोडेखोरांनी लुटून नेली का हे अजूनही समोर येऊ शकले नाही.
शिंदे स्कूलबसवर चालक लड्डा यांच्या बंगल्याची पुरेपूर टीप देण ारा देवीदास शिंदे हा दरोडेखोर योगेश हाजबेचा मित्र आहे. एका खासगी शाळेच्या स्कूलबसवर चालक म्हणून काम करतो. तो जादूटोण्याच्या, गुप्तधन दाखविण्याच्या काळ्या धंद्यातही माहीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिंदे यानेच हाजबेला घेऊन बंगल्याची रेकीही केली. त्यासाठी वापर लेली कार, मोपेडही पोलिसांनी जप्त केली आहे. हाजबेच्या लॉजवर शिंदेचा वावर होता, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
दरोडेखोरांना अटक झाली तरी सोने कुठे गेले, असा सवाल करत खुद्द पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे ओढले. दरोड्यात सोनेही साडेपाच किलोपेक्षा अधिक चोरीला गेल्याचे सांगून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी गुरुवारी पोलिस आयुक्तालय गाठून दरोडेखोरांना, गुन्हेगारांना सहकार्य करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे आदेश दिले होते. १५ दिवसांत पालकमंत्री दोनवेळा आयुक्तालयात आल्याने पोलिस दलही हैराण झाले. शुक्रवारी (दि.३०) पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुमारे तीन तास चालेल्या या बैठकीत त्यांनी काही सूचनाही केल्या. सोने लवकरात लवकर हस्तगत करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. यासाठी काही जुन्या जाणत्या अधिकाऱ्यांनाही कामाला लावल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.