Bribe Case pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagr|आरोपीला मदत करण्यासाठी घेतली लाच, पीएसआयसह कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Chhatrapati Sambhajinagr | मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात; दोन महिन्यापूर्वी एपीआय अडकला होता जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जीवघेण्या हल्ल्याच्या गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. ८) रात्री उशिरा बेड्या ठोकल्या.

विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांपूर्वी याच पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याला लाच प्रकरणात अटक झाली होती. सलगच्या या कारवायांमुळे मुकुंदवाडी पोलिसांच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका जीवघेण्या हल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपीला तपासात मदत करण्यासाठी संबंधित पोलीस उपनिरीक्षक आणि एका कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर, पथकाने मंगळवारी रात्री उशिरा मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सापळा रचला आणि दोघांना रंगेहाथ अटक केली.

रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची कारवाई सुरू असल्याने एसीबी कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत आणि सविस्तर माहिती देण्यात आली नव्हती. मात्र, एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT