Sambhajinagar News : मोक्याच्या ठिकाणचे व्यापारी गाळे कवडीमोल भाड्याने !

मनपाचा अजब कारभार : पैठण गेट, जय टॉवरमधील गाळ्यांसाठी ३३०० ते १४ हजारांचे मासिक भाडे
Sambhajinagar News
Sambhajinagar News : मोक्याच्या ठिकाणचे व्यापारी गाळे कवडीमोल भाड्याने !file photo
Published on
Updated on

Commercial units in prime locations at dirt-cheap rents!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची आर्थिक स्थिती आधीच डळमळीत असताना, उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याऐवजी मोक्याच्या ठिकाणचे व्यापारी गाळे अत्यंत अल्प भाड्याने देण्याचा प्रकार समोर आला आहे. पैठण गेटसारख्या मुख्य बाजारपेठेतील गाळ्यांसाठी अवघे ३,३०० ते ३,९०० रुपये मासिक भाडे निश्चित करण्यात आले असून, संबंधितांच्या नावांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. दुरुस्तीच्या नावाखाली अत्यंत कमी भाडे आकारले जात असल्याने महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

Sambhajinagar News
Crime News : पैसे मागितल्याच्या रागातून भावाच्या कुटुंबावर हल्ला; पिता-पुत्राला ५ वर्षे सक्तमजुरी

महापालिकेने शहरातील विविध व्यापारी संकुलांतील गाळे तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी निविदा मागवल्या होत्या. यात सर्वाधिक दर देणाऱ्या निविदाधारकांना हे गाळे दिले जाणार आहेत. पैठण गेट येथील 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व्यापारी संकुला'तील गाळा क्रमांक ए-७आणि एस-१० हे दोन गाळे शेख रय्यान शेख अब्दुल रहेमान यांना, तर एस-१ आणि एस-१२ हे दोन गाळे शेख अरशीयान अब्दुल रहेमान यांना देण्यात येणार आहेत.

एकनाथनगर व्यापारी संकुलातील एका गाळ्यासाठी 'संघर्ष सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थे'ने ३,९०० रुपये मासिक भाड्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, जय टॉवरमधील गाळा क्र. ७ व ८ साठी नितेश पगारे यांनी अनुक्रमे ६,५०० व ५,५०० रुपये, तर गाळा क्र. ५ साठी वैभव उंटवाल यांनी सर्वाधिक १४, १०० रुपये मासिक भाडे दिले आहे.

पुढील बैठकीत होणार निर्णय

हा प्रस्ताव ४ सप्टेंबर रोजीच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. मात्र, आयुक्त अमोल येडगे उपस्थित नसल्याने सभापती अनिल मकरिये यांनी बैठक तहकूब केली. त्यामुळे या कवडीमोल भाड्याच्या प्रस्तावावर आता आगामी बैठकीत निर्णय होणार आहे.

Sambhajinagar News
Mangalsutra Snatched : धावत्या स्कुटीवरून शिक्षिकेचे मंगळसूत्र ओरबाडले

प्रशासनाचा युक्तिवाद आणि वस्तुस्थिती

सध्या हे गाळे नादुरुस्त असल्याने त्यांची दुरुस्ती निविदाधारकांनाच स्वखर्चाने करावी लागणार आहे. गाळे रिक्त पडून राहण्यापेक्षा त्यातून काहीतरी उत्पन्न मिळावे आणि दुरुस्तीचा खर्च गाळेधारकांवरच पडत असल्याने हे भाडे कमी ठेवल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, महापालिकेने स्वतः थोडा खर्च करून या गाळ्यांची दुरुस्ती केली असती, तर याच मोक्याच्या ठिकाणांहून दुप्पट-तिप्पट भाडे मिळू शकले असते, अशी दबक्या आवाजात महापालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news