Sambhajinagar crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar crime : समृद्धीने मुंबईला गोमांस तस्करी; आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश

दोन टन गोमांस गुन्हे शाखेकडून जप्त; पाच जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांची नजर चुकवण्यासाठी गाडीवर बनावट नंबरप्लेट लावून, आतमध्ये रिकाम्या पुठ्यांच्या खोक्यांचा बनाव रचत त्याखाली गोमांसाची तस्करी करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. माळीवाडा परिसरात समृद्धी महामार्गावर चढण्यापूर्वीच तस्करांची गाडी पकडली. या कारवाईत दोन टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. अटकेतील दोन तरुणांसह पाच जणांवर दौलताबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उघडकीस आली आहे.

आदिल रफिक शेख (२४) आणि जिशान सादिक सय्यद (२६, दोघे रा. श्रीरामपूर, अहिल्यानगर) अशी अटकेतील तर मोहसीन कुरेशी (रा. बीफ मार्केट श्रीरामपूर), जुबेर (रा. गल्लेबोरगाव) आणि गल्ला (मुंबई) अशी अन्य आरोपींची नावे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.

कन्नडकडून बोलेरो पिकअप (एम.एच. ४५ ए.एफ. ७७१३) गोमांस घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने माळीवाडा येथे समृद्धी महामार्गाजवळ सापळा लावला. तस्करांची गाडी दिसताच पथकाने थांबवून चौकशी केली आणि गाडीची झडती घेतली. गाडीच्या मागील बाजूस कुणालाही संशय येऊ नये म्हणून कोपऱ्यांवर पुठ्याचे खोके रचले होते. मात्र, या खोक्यांच्या मागे पांढऱ्या रंगाच्या ताडपत्रीत बर्फ टाकून लपवलेले गोवंश जातीचे मांस आढळून आले.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, योगेश नवसारे, विजय निकम, प्रदिप दंडवते, जालिंदर गोरे, राजेश यदमळ, गणेश सागरे, सागर पांढरे, संतोष चौरे, सोमनाथ दुकळे यांच्या पथकाने केली. से (गुन्हे) माल पोहोच करण्यासाठी ५ हजार श्रीरामपूरचा तस्कर मोहसीन याने हा माल मुंबईपर्यंत पोहोचवण्यासाठी आदिल आणि जिशान या दोघांना काम दिले होते. तीन तासांत आमने इंटरचेंजपर्यंत माल पोहोचविण्याचे त्यांना ५ हजार रुपये मिळत होते.

खुलताबाद ते मुंबई तस्करीचे जाळे

गोमांस तस्करीची पाळेमुळे खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगावपर्यंत जोडली आहेत. पसार आरोपी जुबेरने गल्ले बोरगाव येथून या गाडीत दोन टन गोमांस भरून दिले होते. हे मांस मुंबईतील 'गल्ला शेठ' नावाच्या व्यापाऱ्यापर्यंत पोहोच केले जाणार होते. गल्ला शेठ हे मांस ३५० रुपये प्रतिकिलो या दराने खरेदी करत होता.

आमने इंटरचेंज' पासून दुसऱ्या वाहनाने विल्हेवाट

बोलेरो गाडी समृद्धी महामार्गावरून थेट भिवंडी-ठाणे जवळील 'आमने इंटरचेंज'वर पोहोचणार होती. पिकअप गाडीची पोलिस तपासणी करू शकतात. त्यामुळे तस्करांनी आमने इंटरचेंजवर हा सर्व माल एका कारमध्ये' हलवण्याचे नियोजन केले होते. खाजगी कारवर लवकर संशय येत नसल्याचा फायदा ही टोळी घेत होती. तेथून हे मांस कल्याण आणि ठाणे परिसरातील हॉटेल्स व बाजारात पोहोच केले जाणार होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT