Crime News  pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar Crime : बनावट कागदपत्रांनी ३५ लाखांचा गंडा

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जालननगर येथील प्लॉट स्वतःच्या मालकीचा असल्याचे भासवून, बनावट कागदपत्रांच्या आधारे पशुधन विकास अधिकाऱ्याची तब्बल ३५ लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जा-नेवारी २०२३ ते जून २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात मोहम्मद एजाज, ताजुन्नीसा बेगम मोहम्मद एजाज, मोहम्मद इम्तियाज, मोहम्मद अदनान (सर्व रा. आरेफ कॉलनी) आणि शिवकुमार चव्हाण (रा. पहाडसिंगपुरा) आदी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मोहम्मद रियाझ (५९ रा. आरिफ कॉलनी) याला अटक करण्यात आली असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनपाचे पशुधन विकास अधिकारी शेख शाहेद शेख निजाम (५५, रा. जालाननगर) यास जानेवारी २०२३ मध्ये ब्रोकर मोहम्मद रियाज व त्याचा मुलगा अदनान यांनी जालाननगर येथील स्वतःचा प्लॉट असून तो प्लॉट नर्मदा अग्रवाल यांच्याकडून जीपीए करून घेतल्याचे सांगितले. याची खातरजमा होताच शेख शाहेद यांनी प्लॉटचा व्यवहार ४७ लाखांत निश्चित केला. त्यापैकी २५ लाख रुपये धनादेशाद्वारे, ४ लाख रुपये ऑनलाइन व ६ लाख रुपये रोख असे ३५ लाख रुपयांची रक्कमही एजाज यांना दिली. उर्वरित रक्कम खरेदीखत करून दिल्यानंतर देण्याचे ठरवून १६ फेब्रुवारी २०२३ रोजी करारनामा करण्यात आला.

शेख शाहेद यांनी दुसरे प्लॉट द्या किंवा पैसे परत करा असा तगादा लावला. त्यावर आर- ोपींनी पैसे आल्यानंतर देऊ असे सांगितले. त्यामुळे शाहेद यांनी वेदांतनगर पोलिस ठाणे गाठून वरील पाच जणांविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक नामदेव सुपे करीत आहे.

ते प्लॉट दुसऱ्याचेच

व्यवहारानंतर प्लॉटची रजिस्टरी करण्यास टाळाटाळ करत असल्याने शाहेद यांनी पैसे परत मागितले. या प्लॉटचा जीपीए शिवकुमार चव्हाणच्या नावावर असल्याचे सांगण्यात आल्याने चव्हाण २० लाख व एजाज १५ लाख देणार असा करार करण्यात आला. दरम्यान पैसे तर दिले नाही, परंतु या बदल्यात बीडबायपास येथील प्लॉट नावावर करून देण्याचे आश्वासन दिले. त्या प्लॉटची माहिती काढली असता, ते प्लॉटही दुसर्यांचेच असल्याचे समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT