मौलानाने मारहाण केल्याने चिमुकल्याच्या पाठीवर असे वळ उमटले आहेत. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Child assault : चेलीपुऱ्यातील मदरशात ११ वर्षीय चिमुकल्याला मारहाण

सबक पाठ न झाल्याने फायबरची पट्टी, लाथाबुक्क्यांनी मारल्याने अंगावर वळ; मौलानावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर :शिकवलेला सबक (धडा) पाठ न झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून ११ वर्षीय विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी, आणि प्लास्टिकच्या फायबर पट्टीने छाती, बरगड्या व पाठीवर अमानुष मारहाण केल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १२ जुलै रोजी चेलीपुरा भागातील 'मदरसा तालीमील कुराण पिरसुभान मशीद' अंतर्गत असलेल्या 'ताज उल उलूम' शाळेत घडली.

या क्रूर मारहाणीमुळे चिमुकल्याच्या अंगावर वळ उमटले असून, याप्रकरणी आरोपी शिक्षक फेरोज मौलाना याच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात बाल न्याय कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोशनगेट भागात राहणाऱ्या पीडित मुलाच्या ३२ वर्षीय आईच्या तक्रारीनुसार, त्यांचा ११ वर्षीय मुलगा चेलीपुऱ्यातील मदरशाच्या शाळेत उर्दू माध्यमात इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेतो. १२ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मुलाला चेलीपुऱ्यातील मदरशात शिक्षणासाठी सोडले होते.

त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्या मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी मदरशात गेल्या. त्यावेळी आईला पाहताच प्रचंड घाबरलेला चिमुकला ढसाढसा रडू लागला. आईने त्याला धीर देत विचारपूस केली असता त्याने रडत रडत या अमानुष मारहाणीचा घटनाक्रम सांगितला.

यापूर्वीही तीन वेळा मारहाण झाल्याचा आरोप

चिमुकल्याच्या आईने सांगितले की, मुलाला यापूर्वीही तीन वेळा अशाचप्रकारे मारहाण करण्यात आली. तेव्हा मदरसाच्या प्रमुखांना भेटून मुलाला मारहाण करू नका, अशी विनंती केली होती. मात्र पुन्हा त्याला अमानुषपणे मारहाण झाली. अन्य मुलांनाही तिथे मारहाण केली जाते, असा आरोप आईने केला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT