Sambhajinagar smart buses audit pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar smart buses audit : आता सर्वच स्मार्ट सिटी बसेसचे होणार ऑडिट

मनपा आयुक्तांचे आदेश : सुरक्षेच्या दृष्टीने विशेष ड्राइव्ह, तांत्रिक तपासणीतून बसेसची कुंडली

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : धावत्या स्मार्ट बसचे चाक निखळणे आणि रेल्वेस्टेशनवरील बसला आग लागण्याच्या दोन गंभीर घटनांनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा थेट संबंध असलेल्या या घटनांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शहरातील सर्व १०० स्मार्ट बसेसचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक बसची सुरक्षेच्या दृष्टिने सखोल तपासणी करण्यासाठी विशेष ड्राइव्ह राबविण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.

महापालिकेच्या स्मार्ट सिटीबसला रेल्वेस्टेशन बसस्थानकात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. बसखाली ऑइल पडलेले असल्याने आग अधिक वाढली. या घटनेनंतर सोमवारी (दि.७) दौलताबाद घाटात धावत्या स्मार्ट बसचे चाक निखळल्याची घटना घडली. या घटनेनंतर बसच्या तांत्रिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या दोन्ही घटनांकडे स्वतंत्र अपघात म्हणून न पाहता स्मार्ट बसच्या सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी सर्व १०० स्मार्ट बसेसचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रत्येक बसची सुरक्षेच्या दृष्टिने सखोल तपासणी करण्यात येणार असून बसेसची सुरक्षेच्या दृष्टिने विशेष ड्राइव्हमध्ये सखोल तपासणी करून अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्मार्ट बससेवेत प्रवाशांची सुरक्षितता हा तपासणीचा केंद्रबिंदू राहणार आहे. दरम्यान, महापालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जानेवारी २०१९ पासून स्मार्ट बससेवा सुरू आहे.

मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी सर्व १०० स्मार्ट बसेसचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रत्येक बसची सुरक्षेच्या दृष्टिने सखोल तपासणी करण्यात येणार असून बसेसची सुरक्षेच्या दृष्टिने विशेष ड्राइव्हमध्ये सखोल तपासणी करून अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्मार्ट बससेवेत प्रवाशांची सुरक्षितता हा तपासणीचा केंद्रबिंदू राहणार आहे. दरम्यान, महापालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जानेवारी २०१९ पासून स्मार्ट बससेवा सुरू आहे.

स्मार्ट सिटीने १०० बसेस खरेदी केल्या होत्या. प्रारंभी या बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक बसेसची स्थिती खालावली असून, इंजिनसह अन्य तांत्रिक बिघाडांमुळे बस बंद पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच विविध तांत्रिक बिघाडांमुळे सध्या सुमारे २० ते २५ बसेस डेपोत उभ्या आहेत, तर ७५ ते ८० बसेस प्रत्यक्ष सेवेत आहेत. त्यामुळे उपलब्ध बसेसची तांत्रिक स्थिती आणि प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी घेतलेल्या विशेष तपासणीच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

स्पेशल ड्राइव्ह घेण्याचे आदेश रेल्वेस्टेशन येथे बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. बसखाली ऑइल पडलेले असल्याने आग वाढली. तर धावत्या बसचे चाक निखळण्याची घटना मात्र गंभीर आहे. सर्व बसचे ऑडिट करण्याचे तसेच सर्व बसेसची सुरक्षेच्या दृष्टिने सखोल तपासणी करण्यासाठी स्पेशल ड्राइव्ह घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा घटना यापुढे होणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
अमोल येडगे, महापालिका आयुक्त.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT