Murder Case Invistigation  (Pudhari File Photo)
छत्रपती संभाजीनगर

Sirsgaon Murder Case | दुष्मन का दुष्मन बनले दोस्त; सिरसगाव खुनाचा थरार उलगडला..

local crime branch action | स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Murder Case Invistigation

कन्नड : दि. १२ रोजी पोलीस ठाणे ग्रामीण हद्दीत मौजे सिरसगाव येथे सिरसगाव ते जैतापूर रोडलगत शेत गट नं २८ मध्ये सिरसगाव येथील राजाराम उर्फ राजु भावसिंग चुंगडे (वय- ४७ वर्षे) हे त्यांच्या शेतातील घरासमोरील खडीवर मोबाईल बघत बसले असतांना अचानक तीन ईसमांनी पाठीमागुन येऊन धारदार कोयत्याने डोक्यात, हातावर वार सात ते आठ वार करुन जागीच ठार करून मारेकरी मोटार सायकलवरुन फरार झाले होते. मयताचा मुलगा फिर्यादी सुरज राजाराम चुंगडे यांच्या फिर्यादी वरुन पोलीस ठाणे ग्रामीण येथे गु.र.न. 173/2025 कलम 103(1),3 (5) भा.न्या.सं.-2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरून गुन्ह्यातील तीन आरोपीना चोवीस तासाच्या आत जेरबंद केले.

गुन्ह्याचा तपास सुरु असताना गावातील पार्श्वभूमी व अलीकडील काही दिवसापुर्वी गावात घडलेल्या गुन्हयांच्या घटणेबाबत सखोल चौकशी केली असता मिळालेल्या गोपणीय बातमीच्या आधारे गावातील आरोपी आनंद अमर राजपूत (वय- २५ वर्षे) यास ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने आरोपी समीर समद कुरेशी (वय-२० वर्षे) इरफान शकील शहा (वय- २०) दोघे ही रा. सिरसगाव यांना साथीदार करून राजू चुंगडे यांना कोयत्याने डोक्यात वार करुन जिवंत ठार मारल्याची कबुली दिली.

घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपी आनंद अमर राजपूत यास संशयित म्हणून रात्रीच ताब्यात घेतले होते तर समीर कुरेशी व इरफान शहा हे दोघे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरला फरार झाले होते. पोलिसांनी कसोसिने शोध घेऊन दी. १३ रविवार रोजी दोघांच्या श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आनंद राजपूत याच्यासह मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली.

२४ तासाच्या आता आरोपीना अटक करण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी, विजयकुमार ठाकुरवाड, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, ग्रामीचे सपोनि रामचंद्र पवार, पवन इंगळे, सुधिर मोटे, श्रीमंत भालेराव, वाल्मीक निकम, विठ्ठल डोके, शिवानंद बनगे, गोपाल पाटील, प्रशांत नांदवे, अशोक वाघ, महेश विरूटे, योगेश तरमाळे, जिवन घोलप तसेच ग्रामीणचे अमोल जाधव यांनी केली आहे.

तीन आरोपीची कारणे वेगवेगळी

मयत राजू चुंगडे यांनी आरोपी क्रं. एक अमर राजपुत यास एक ते दिड वर्षापुर्वी मारहाण केली होती त्याचा राग मनात ठेवल्याने, तर आरोपी क्र.दोन समीर कुरेशी याचेवर दाखल झालेल्या अॅट्रॉसीटीच्या गुन्हात मदत न केल्याने, तसेच आरोपी क्रं.तीन ईरफान शहा याने सदर मयत राजू चुंगडे नेहमी कब्रस्तानच्या जागेच्या वादावरुन आमच्या समाजाला मदत करत नाहीत. यापुर्व वैमन्यष्यातून खून केला असे कबूल केले. तिघांची कारणे वेगवेगळी असल्याने दुश्मन का दुष्मन अपना दोस्त या प्रमाणे तिघांनी एकत्र येऊन खुनाचा कट रचला असावा अशी चर्चा आहे.

दिशाभूल करण्यासाठी त्याने परिधान केला महिलेचा टॉप

गुन्हा केल्या नंतर आपला तपास लागू नये तपासला वेगळे वळण लागावे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी समीर समद कुरेशी याने गुन्हा करताना महिलांचा टॉप अंगात घातला होता. यामुळे गुन्हात एक महिला असल्याचा समज झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT