नागझरी नदीपात्रात केमिकल ओतले file photo
छत्रपती संभाजीनगर

नागझरी नदीपात्रात केमिकल ओतले

शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीतीने पोलिस ठाण्यात तक्रार

पुढारी वृत्तसेवा

Chemicals dumped into the Nagzhari riverbed.

दौलताबाद, पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गालगतच्या नागझरी नदी परिसरात अज्ञातांकडून धोकादायक केमिकल टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर कॉरिडॉरवरील साखळी क्र. ४४३+२०० परिसरात रात्रीच्या वेळी अज्ञात टँकरमधून नदीत केमिकल सोडले जात असल्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहे.

या प्रकरणी दौलताबाद व माळीवाडा शिवारातील शेतकरी संतोष गाणार आणि रावसाहेब शेरकर यांनी दौलताबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. नदीतील साचलेल्या पाण्यात केमिकल मिसळल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT