Charas smugglers have been arrested by the police
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मुकुंदवाडी पोलिसांनी अंबिकानगरात चरस तस्करांची टोळी गजाआड करून तब्बल १५ लाखांचे दीड किलो चरस जप्त केले होते. याप्रकरणी महिलेसह पाच तस्करांना अटक केली होती. त्यातील चौघांची आझाद चौक, कटकटगेट भागात पोलिसांनी गुरुवारी (दि.४) धिंड काढली.
आरोपी मोहमद मुजममील मोहमद नजीर (२१), लोमान नोमन खान इरफान खान (२१, दोघे रा. रहमान कॉलनी), मोहमद लईखुद्दीन मोहमद मिराजजोद्दीन (२५, रा. रहीमनगर), शेख रेहान शेख अशपाक (१९, रा. कटकटगेट) यांना येथेच्छ प्रसाद देण्यात आल्यानंतर चिंड काढण्याची पोलिसांनी सुरू केलेली परंपरा कायम ठेवली आहे. ज्या भागात यांनी अमली पदार्थ विक्रीचे नेटवर्क सुरू केले होते, त्या आझाद चौक, कटकटगेट, रहेमानिया कॉलनी भागात पायी धिंड काढली.
सराईत गुन्हेगार तेजा, हर्षल मुळे, एनडीपीएस पथकाने अटक केलेले इरफान घोरवडे, सय्यद नजीरोद्दीन, अमजत खान या आर ोपींची धिंड काढली होती. आता चरस तस्करी करणाऱ्या तस्करांची धिंड काढून पोलिसांनी नवी परंपरा सुरू केल्याची चर्चा आहे.