Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेट Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Property Survey : मालमत्ता सर्वेक्षण, पुनर्निरीक्षणच्या निविदेतील पात्रता निकष बदला

कंत्राटदारांची मागणी : जॉइंट व्हेंचरला परवानगी, ग्रामपंचायतींचा अनुभव ग्राह्य धरण्याची सूचना

पुढारी वृत्तसेवा

Change eligibility criteria in tender for property survey, re-inspection

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या मालमत्ता सर्वेक्षण व पुनर्निरीक्षणाच्या निविदेतील पात्रता निकषांमध्ये बदल करण्याची मागणी इच्छुक कंत्राटदारांनी केली आहे. जॉइंट व्हेंचरला निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा द्यावी, तसेच ग्रामपंचायतींमध्ये केलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा अनुभव ग्राह्य धरावा, अशी मागणी करण्यात आली. निविदेतील अटी-शर्तीवर चर्चा करण्यासाठी झालेल्या प्री-बिड बैठकीत पाच कंत्राटदार एजन्सींच्या प्रतिनिधींनी विविध सूचना मांडल्या. मात्र, निविदेतील अटींमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरातील मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण आणि पुनर्निरीक्षण करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुषंगाने आयुक्तांच्या दालनात प्री-बिड बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, मालमत्ता कर विभागाचे महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर उपायुक्त विकास नवाळे, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांच्यासह पाच कंत्राटदार एजन्सींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत निविदेतील पात्रता निकषांवर कंत्राटदारांनी आक्षेप व सूचना नोंदविल्या. मोठ्या प्रमाणावरील कामासाठी जॉइंट व्हेंचरला सहभागी होण्याची संधी द्यावी, तसेच ग्रामपंचायतींच्या हद्दीत केलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा अनुभवही पात्रतेसाठी विचारात घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय सर्वेक्षणादरम्यान संकलित होणारा डेटा कंत्राटदाराकडेच ठेवण्याची मागणीही एका एजन्सीकडून करण्यात आली. महापालिका प्रशासनाने मात्र, निविदेतील अटी-शर्तीमध्ये बदल करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, निविदा सादर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT