Paithan MIDC Police  
छत्रपती संभाजीनगर

छ. संभाजीनगर : पैठण येथे अट्टल चोरटा जेरबंद; १३ लाखांच्या दुचाकी जप्त

अविनाश सुतार

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून १३ लाख ७० हजार किंमतीच्या चोरी केलेल्या मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. रामेश्वर अंकुश धनगर (वय २४, रा. गणेशनगर, पिंपळवाडी पिं, पैठण एमआयडीसी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामेश्वर धनगर याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. दरम्यान धनगर विविध ठिकाणी मोटरसायकल चोरी करून विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधारे त्याला अटक करून चौकशी केली असता त्यांने चोरीची कबुली दिली.

एमआयडीसी पोलीस हद्दीत ३ गुन्हे, शिक्रापूर (पुणे) पोलीस ठाणे हद्दीत ३ गुन्हे, लोणीकंद १ गुन्हा, रांजणगाव गणपती (पुणे) १ गुन्हा, आष्टी (जिल्हा बीड) १ गुन्हा, मुकुंदवाडी पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर १ गुन्हा त्याच्या नावावर दाखल झाले आहेत. त्याच्याकडून १३ लाख ७० हजार रुपयांच्या बुलेट, पल्सर, स्प्लेंडर, पॅशन प्रो, टीव्हीएस स्टार, अशा १५ मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत.

ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे, बीट अंमलदार जावळे, गणेश खंडागळे, राहुल मोहतमल, राजेश सोनवणे यांनी केली. पुढील तपास पोलीस नाईक राहुल मोहतमल करत आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT