छत्रपती संभाजीनगर

छ. संभाजीनगर: ब्राम्हणगाव येथे ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने १२० जनावरांची सुटका

अविनाश सुतार

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील ब्राम्हणगाव परिसरातील डोंगर भागात कत्तलीसाठी जाणाऱ्या १२० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची जनावरे ड्रोन कॅमेरेच्या मदतीने छापा मारून ताब्यात घेतली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, दंगा काबू पथक आणि पाचोड पोलिसांसह १५० पोलीस कर्मचाऱ्यांनी शनिवारी (दि.१५) केली. यामुळे डोंगर भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, बकरी ईद सणानिमित्त कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर जनावरांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे डोंगर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेले जनावरांची पोलीस पथकाने माहिती घेऊन सापळा लावला. यावेळी तस्करी करणाऱ्या ३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक वाहन जप्त केले. सर्व जनावरे वैद्यकीय तपासणी करण्यासाठी चिकलठाणा येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आली.

याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीष वाघ, शरदचंद्र रोडगे, सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, भगतसिंग दुल्हत, दगडू जाधव, लहू थोटे, वाल्मिक निकम, संतोष पाटील, गोपाळ पाटील, संजय घुगे, दीपश नांगझरे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT