पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यात रविवारी अवकाळी पाऊस पडला. आडुळ महसूल मंडळात सर्वाधिक ८४ मी.मी पावसाची नोंद झाली. अवकाळी पावसाने घराची पडझड होऊन मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार रविवारी पैठण तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. तहसीलदार सारंग चव्हाण यांनी सांगितले की, पैठण ३० आत्तापर्यंत ४०५, पिंपळवाडी पिं ४२ (४११), बिडकीन ५५ (८८०), ढोरकिन ४३ (५२६), बालानगर ६० (६२९), नांदर ४५ (३६०), पाचोड ७२ (४७०), लोहगाव ५७(४७८), विहामांडवा ४९ (३५६), तर आडुळ महसूल मंडळात सर्वाधिक ८४ (५१६) पावसाची नोंद झाली आहे.
या अवकाळी पावसामुळे आडुळ येथे आंबेडकर नगर येथील रहिवासी कैलास धर्माजी सातपुते यांच्या घराची मोठी पडझड झाली. सुदैवाने यात कुठलीही हानी झालेली नाही. सरपंच बबन भावले, उपसरपंच जाहेर शेख, पोलीस पाटील भाऊसाहेब पिवळ, मोसिन तांबोळी, अजीम शेख, योगेश बनकर यांनी पडझड झालेल्या घराची पाहणी केली. याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. यासह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
हेही वाचा