छत्रपती संभाजीनगर

छ. संभाजीनगर : पिंपळगाव पेठ येथे विहिरीत पडलेल्या बैलाला जीवदान

अविनाश सुतार

सिल्लोड: पुढारी वृत्तसेवा : पिंपळगाव पेठ (ता. सिल्लोड) येथे ३० फूट खोल विहिरीत सांड बैल चारा खाण्याच्या नादात पाय घसरून पडला. वन विभागाच्या टीमने २ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बैलाला क्रेनच्या सह्याने सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. आणि दैव बलवत्तर म्हणून बैल बचावला.

याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील काही महिला शेळ्या चारण्यासाठी शेतात गेल्या होत्या. यावेळी महिलांना विहिरीत बैल पडल्याचे आढळले. याची माहिती त्यांनी गावातील काही लोकांना दिली. यामुळे काही शेतकऱ्यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली.

विहिरीतून बैल वर कसा काढायचा असा प्रश्न शेतकऱ्यांन पुढे निर्माण झाला होता. गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी लतिप पठाण यांना याची माहिती दिली. त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे यांना रेस्क्यू टीम पाठविण्यास सांगितले. भिसे यांनी आपली वन विभागची टीम वनरक्षक साईनाथ पवार, विलास नरवाडे, वनसेवक लक्समन ताठे यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर बैलाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT