CEO's office locked for water
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : तीसगावच्या म्हाडा कॉलनीतील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकल्याने गेल्या चार-पाच महिन्यांपासून येथील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे सोमवारी (दि.१) सकाळी ५० ते ६० महिला व पुरुषांनी शहरातील म्हाडा कार्यालय गातून जे नागरिक नियमित बिल भरतात त्यांना पाणीपुरवठा सुरू करा, अशी मागणी करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाला जवळपास एक तास कुलूप ठोकले होते.
तीसगाव येथील गट क्रमांक १०४/१ मध्ये म्हाडाच्या वतीने अल्प उत्पन्न गट योजना २००५ मध्ये पूर्ण करून ४५३ गाळेधारकाकांना ते वाटप करण्यात आले आहेत. येथील गाळेध ारकांचे पाणी व्यवस्थापन म्हाडामार्फत करून येथील नागरिकांकडून जमा करण्यात येणारी नळपट्टी सिडको प्रशासनाकडे जमा करण्यात येते. म्हाडा प्रशासनाच्या नियमानुसार योजनेतील गाळेधारकांमार्फत गृहनिर्माण सोसायटी स्थापन करून ३ महिन्यात पाणी व्यवस्था तसेच इतर सुविधा हस्तांतरित करून घेणे अपेक्षित होते.
दरम्यान एप्रिल २०२४ मध्ये म्हाडा कृती समिती व म्हाडाचे अधिकारी यांच्यात याविषयावर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत चार महिन्यात सोसायटी स्थापन करून सुविधा हस्तांतरण करू, असे आश्वासन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र या कालावधीत सोसायटी स्थापन न करण्यात आल्याने १ ऑगस्ट २०२४ पासून येथील पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी गाळेधlरकांची तथा सोसायटीची राहील, असे पत्र म्हाडाने कृती समितीला देऊन नागरिकांचे पाणी बिल स्वीकारणे बंद केले होते. दरम्यान, नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकलेली असल्याने सिडकोने म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा गेल्या चार महिन्यांपासून बंद केला आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात येथील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
संतप्त नागरिकांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनाला ठोकले कुलूप
ज्या लोकांनी पाणी बिल भरले आहे, त्यांचा पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा, बँकेकडून कर्ज घेतल्यानतंर आपण जे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ०.२५ टक्के शुल्क आकारत आहात ते बंद करण्यात यावे आदी मागण्यांसाठी गोपीनाथ पाटील यांनी २ डिसेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला होता. यामुळे सोमवारी त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्र्य नवले यांना भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते.
आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गोपीनाथ पाटील यांच्यासह शिवाजी हिवाळे, संजय अनपट, रावसाहेब कदम, संजय जगताप, कैलास घोलप, बाळासाहेब केरे, सतीश बावळे, संतोष गवळी, संतोष देगावकर, गोविंद कोकरे, शिवाजी जाधव, कल्पना वाघमारे, रेणुका कदम, संगीता केरे, ज्योती सानप, सीमा पवार, कल्पना तायडे आदी ५० ते ६० जणांनी ज्या लोकांनी पाणी बिल भरले आहे, त्यांचा पाणीपुरवठा तात्काळ सुरू करा, अशी मागणी करत मुख्य कार्यकारी अधिकारी नवले यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नवले यांची वरिष्ठांसोबत ऑनलाईन बैठक सुरू असल्याने सुरक्षारक्षकाने त्यांना दालनात जाण्यास मज्जाव केला. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी घो षणाबाजी करत नवले यांच्या दालनाच्या मुख्यद्वाराला जवळपास तासभर कुलूप ठोकून दारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. याविषयी म्हाडा प्रशासनाकडून पोलिसांना कळविण्यात आल्याने क्रांती चौक ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेत नागरिकांची समजूत काढली. नागरिकांनी संयमाची समजूतदारपणाची भुमिका घेतल्याने वाढलेला तणाव कमी झाला.
लोकांकडे पाणीपट्टी थकल्याने गेल्या चार-पाच महिन्यांपासून सिडकोने म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. यामुळे जे नियमित पाणी बिल भरतात अशांनाही विकतचे पाणी घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. अशाने नाहक आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.- गोपीनाथ पाटील, नागरिक
एकीकडे शासन हर घर नल जोडण्याची घोषणा करते, मात्र 66 आम्हला गेल्या चार-पाच महिन्यांपासून टैंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. टैंकरचे पाणी दूषित असल्याने अंगाला खाज येणे आदी समस्या भेडसावत आहे.- कल्पना वाघमार, रहिवाशी
म्हाडा कॉलनीत एमआयजीमध्ये रा-हणाऱ्या ३८ घरमालकांनी सोसायटी स्थापन केली आहे. सोसायटी मध्ये पाणी सुरू करण्यासाठी लवकरच आम्ही ५ लाख रुपये भरणार आहोत. जे बिल भरणार नाहीत, अशा लोकांचे नळ कनेक्शन म्हाडाच्या वतीने कट केले जाणार आहेत.- शिवाजी हिवाळे, अध्यक्ष, म्हाडा कृती समिती, तीसगाव
एक कोटीची थकबाकी तीसगाव येथे म्हाडाकडून साडेच-ारशे घरांची वसाहत उभारण्यात आली आहे. येथील अनेक गाळेधारकांनी वर्षानुवर्षांपासून पाणी बिल भरलेले नाही. म्हाडाचे येथील गाळेधारकांकडे सुमारे १ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यासंदर्भात नागरिकांना नोटीसही बजावण्यात आल्या असून, म्हाडा कॉलनीचे सिडको तसेच तीसगाव ग्रामपंचायतीकडे हस्तारणासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.दत्तात्रय नवले, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा