ऑर्डर देण्याच्या बहाण्याने केटर्सला लुबाडले File Photo
छत्रपती संभाजीनगर

ऑर्डर देण्याच्या बहाण्याने केटर्सला लुबाडले

डोळ्यात मिरची पूड फेकून बेदम मारहाण

पुढारी वृत्तसेवा

Caters were robbed under the pretext of placing an order.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तुमची साबुदाणा खिचडी खूप आवडली, आम्हाला वास्तुशांतीच्या कार्यक्रमाची ऑर्डर द्यायची असल्याचे आमिष दाखवून एका केटरिंग व्यावसायिकाला निर्जन स्थळी बोलावले. तेथे त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत ८५ हजार ९०० रुपयांचा ऐवज पळवला. ही घटना १८ मार्च रोजी रात्री सातारा परिसरात घडली.

केटरिंग व्यवसायिक सागर प्रकाश सरदार (३२, रा. वेदांतनगर) १७ मार्च रोजी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून खुलताबाद येथील सागर सरदार येथील भंडाऱ्याचे कौतुक केले. आपल्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, त्या करिता ३०० जणांच्या जे वणाची ऑर्डर द्यायची असल्याचे आमिष दाखवून सागरला १८ मार्चला रात्री मेनू ठरवण्यासाठी सातारा परिसरातील एका हॉटेलच्या मागे बोलावण्यात आले.

सागर तिथे पोहोचले असता दुचाकीवर दोन तरुण उभे होते. समोरच घर आहे, तिथे बसून बोलू असे म्हणत त्यांना एका बांधकाम सुरू असलेल्या गल्लीत नेले. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या दोन साथिदारांनी सागर यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यांना काही समजण्याच्या आतच त्यांचे तोंड दाबून रुमाल कोंबला आणि लाकडी दांडके व लोखंडी रॉडने अमानुष मारहाण सुरू केली. यात सागर गंभीर जखमी झाले.

रोख रकमेसह सोनेही पळवले

हल्ल्यानंतर आरोपींनी त्यांच्या कानातील सुमारे ४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या, मोबाईल आणि ५५ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम असा ८५ हजार ९०० रुपयांचा ऐवज लुटून पळ काढला. या घटनेनंतर जखमी अवस्थेत सरदार घरी पोहोचले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे करीत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT