Accident  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar Accident : कारने दुभाजक ओलांडून रिक्षाला उडविले, तरुण ठार

कारचालकावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल ते जळगाव रोडदरम्यान रविवारी (दि.8) दुपारी एका भरधाव कारने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी आणि रिक्षाला भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार केटरिंग व्यावसायिक बुधाराम बिष्णोई (33, रा. बालाजीनगर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, कारचालक साहिल कैलास राऊत (बुलढाणा) याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती सिडको ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 11:30 च्या सुमारास साहिल राऊत हा आपल्या कारने (एमएच-28-एझेड-4147) हर्सूलकडून सिडको बसस्थानकाच्या दिशेने जात होता. जळगाव रोडवरील खासदार काळे यांच्या घरासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजक तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली.

यावेळी समोरून येणाऱ्या बुधाराम बिष्णोई यांच्या दुचाकीला (एमएच-20-एचसी-0087) कारने जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कार पुढे जाऊन जावेद शेख यांच्या रिक्षालाही (एमएच-20-बीटी-8996) धडकली. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT