By the order of the Sillod Tehsildar, a long-standing difficulty faced by farmers for years has been resolved
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील वसई शिव-ारातील गट क्रमांक १८५ मधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला वहिवाट रस्ता अखेर महसूल प्रशासनाच्या पुढाकारातून मोकळा करण्यात आला. तहसीलदार अंकिता ताकभाते यांच्या आदेशानुसार हद्दखुणा कायम करून तयार करण्यात आ-लेला हा बैलगाडी रस्ता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आणि शेती विकासाला चालना देणारा ठरत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गट क्रमांक १८५ मधील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी केवळ पायीच मार्गक्रमण करावे लागत होते. बैलगाडी, ट्रॅक्टर तसेच शेतीसाठी आवश्यक अवजारे शेतापर्यंत पोहोचविणे अत्यंत जिकिरीचे बनले होते.
परिणामी खते, बियाणे व शेती साहित्य वाहून नेताना शेतकऱ्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. उन्हाळ्यातच साहित्य साठवून ठेवण्याची वेळ होती. परिसरात पाण्याची सुविधा उपलब्ध असूनही रस्त्याअभावी मिरची, अद्रक यांसारखी नगदी पिके घेणे शक्य होत नव्हते. शेतकऱ्यांच्या या दीर्घकालीन समस्येची दखल घेत तहसीलदार यांनी गट क्रमांक १८५ च्या हद्दख-येतणा कायम करून गट क्रमांक १८७ व १८५ च्या बांधावरून वहिवाट बैलगाडी रस्ता तयार करण्याचे आदेश दिले.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून रस्ता खुला झाला आणि शेतीला नवी दिशा मिळाली, अशी भावना व्यक्त होत आहे. रस्ता मोकळा करण्याच्या कार्यवाहीदरम्यान उंडणगाव सर्कलचे मंडळ अधिकारी शिवाजी सपकाळ, ग्राम महसूल अधिकारी गिरीश पाटील, नबी शहा, पोलिस जमादार दिलीप तडवी, महिला पोलिस राधा अकोलकर तसेच भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी नागलोत उपस्थित होते. यावेळी शेतकरी किसन लाठे, दादाराव लाठे, इसाक पठाण, संतोष लहाने, प्रकाश लाठे, वकील लाठे, माणिकराव लाठे, पंडित पारवे, पवन पारवे तसेच पोलिस पाटील वाघ आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत आहे.
उत्पादन वाढीसाठी मिळाले नवे बळ
महसूल प्रशासनाच्या या सकारात्मक हस्तक्षेपामुळे वसई शिवारातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेती उत्पादनवाढीसह ग्रामीण विकासालाही नवे बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.