Crime News : वाळूजच्या उद्योजकला सव्वासात लाखांचा गंडा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : वाळूजच्या उद्योजकला सव्वासात लाखांचा गंडा

७ लाख २२ हजार १६० रुपयांची आगाऊ रक्कम घेऊनही मिक्स सॉल्वेन्ट केमिकलचा पुरवठा केला नसल्याचे प्रकरण.

पुढारी वृत्तसेवा

Businessman from Waluj cheated of Rs. 7.5 lakhs

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : ७ लाख २२ हजार १६० रुपयांची आगाऊ रक्कम घेऊनही मिक्स सॉल्वेन्ट केमिकलचा पुरवठा न करणाऱ्या मुंबईच्या धीरज पेट्रोकेमिकल व गॅस फर्मचे धीरज पांडे, संतोष पांडे यांच्यासह भावेश पटेल (रा. मुंबई) यांच्या विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी पोलिसांनी सांगितले की, शिवप्रसाद अग्रवाल (रा. वाळूज) यांची वाळूज एमआयडीसीतील जी ४२ मध्ये गिता केमिकल्स नावाची कंपनी आहे. २०२० मध्ये भावेश पटेल ( रा.मुंबई) हे अग्रवाल यांच्या कंपनीत कच्चे केमिकल खरेदीसाठी आले होते. यावेळी अग्रवाल यांनी त्यांना मिक्स सॉल्वेन्ट केमिकलची गरज असल्याचे पटेल यांना सांगितले.

तेव्हा पटेल यांनी त्यांचे मित्र धिरज पांडे यांच्याकडुन मिक्स सॉल्वेन्ट केमिकल खरेदी करून देऊ शकतो यासाठी मला किलो मागे १ रुपया प्रमाणे कमिशन द्यावे लागेल. त्यानंतर केमिकल तुमच्यापर्यंत पोहच करण्याची जबाबदारी माझी राहील असे सांगून त्यांनी अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला होता. प्रती किलो ६१ रुपये २० पैसे प्रमाणे १० हजार लिटर मिक्स सॉल्वेन्ट खरेदी करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० रोजी अग्रवाल यांनी मालाची आगाऊ रक्कम म्हणून ६ लाख १२ हजार तसेच जीएसटीचे १ लाख १० हजार १६० असे एकूण ७ लाख २२ हजार १६० रुपये आरटीजीएस द्वारे धीरज पेट्रोकेमिकल यांच्या बँक खात्यावर पाठविले होते.

मात्र वेळो-वेळी फोन करून ही अग्रवाल यांना केमिकल मिळाले नाही. यामुळे जुलै २०२१ मध्ये त्यांनी मीरा भाईंदर येथील भावेश पटेल यांच्या कार्यालयात जाऊन केमिकल बाबद विचारणा केली. तसेच धीरज व संतोष पांडे यांच्या मोबाईलवर संपर्क केला तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तर देऊन धीरज पांडे यांना कोरोनाची लागण झाल्याने ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान अग्रवाल यांनी धीरज व संतोष पांडे या पिता-पुत्राविषयी चौकशी केली तेव्हा ते गुंड प्रवृत्तीचे असून त्यांनी केमिकल व इतर साहित्य पुरवठा करण्याचे आश्वासन देऊन अनेकांची फसवणूक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT