Crime News : सराफाला २.८८ कोटींचा गंडा; राजकोटच्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : सराफाला २.८८ कोटींचा गंडा; राजकोटच्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा

विश्वासाला तडा : दीड किलो सोने, पावकिलो चांदी हडपली

पुढारी वृत्तसेवा

Bullion dealer robbed of Rs 2.88 crores; Case Registered Against Rajkot Trader

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील कासारी बाजार भागातील एका सराफा व्यापाऱ्याला राजकोट (गुजरात) येथील तीन व्यापाऱ्यांनी मजुरी कमी घेण्याचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी ८८ लाख २९ हजार ९६० रुपयांचा गंडा घातला. दागिने बनवण्यासाठी दिलेले दोन किलोहून अधिक सोने चांदी हडपली. पैसे मागितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध मंगळवारी (दि.८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरकिशन झिंझुवडीगा, विशाल हरकिशन झिंझुवडीगा आणि कल्पेश झिंझुवडीगा (सर्व रा. राजकोट, गुजरात) अशी आर-ोपींची नावे आहेत.

फिर्यादी आतिश सुभाष सवईवाला (४६) यांचे कासारी बाजार येथे अंकिता ज्वेलर्स नावाचे दुकान असून, ते सोने विक्रीचा होलसेल व्यवसाय करतात. राजकोट (गुजरात) येथील भक्ती ऑर्नामेंट्सचे जयदीप हरकिशन झिंझुवडीगा, विशाल हरकिशन झिंझुवडीगा आणि कल्पेश झिंझुवडीगा यांच्यासोबत सवईवाला यांचा गेल्या १० वर्षांपासून चोख सोन्यापासून दागिने बनवण्याचा व्यावसायिक संबंध होता. मागील दहा वर्षांत त्यांच्यात सुमारे ७ ते ८ कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याने त्यांचे एकमेकांवर चांगले संबंध व विश्वास निर्माण झाला होता.

तर महाराष्ट्रात जिवंत जाणार नाही

झिंझुवडीगा आणि तिच्यासोबत आलेल्या १० ते १५ लोकांनी सवईवाला यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तेथील पोलिसांनीही सर्व बिलांची पाहणी करून आरोपींना वेळ देण्यास सांगून सवईवाला यांना परत पाठवले. त्यानंतर सवईवाला यांनी छत्रपती संभाजीनगरला परतल्यावर फोनवरून संपर्क केला असता, तुमच्यात हिम्मत असेल तर राजकोटला या, आल्यावर परत महाराष्ट्रात जिवंत जाणार नाही, अशी धमकी आरोपींनी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार करत आहेत.

१.५ टक्के मजुरीचेे दाखवले आमिष २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिन्ही आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे आले. त्यांनी मोठ्या कंपन्यांसोबत टायअप असल्याचे सांगून, महाराष्ट्रातील बऱ्याच सोन्याच्या व्यापाऱ्यांनी दागिन्यांच्या ऑर्डर दिल्या आहे. सुरुवातीचे ३ महिने दागिने बनवण्याची मजुरी ३ टक्क्यांवरून १.५ टक्क्यांवर आणल्याचे आमिष दाखवले. सवईवाला यांनी जुना व्यवहार असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला. या विश्वासापोटी सवईवाला यांनी १६९५ ग्रॅम सोन्याचा बार (गोल्ड बुलीयन वार ९९.५०), २२६.११० ग्रॅम चांदी आणि ९६.९०० ग्रॅम कॉपर असे एकूण २०१८.८९० ग्रॅम धातू २० ते २५ दिवसांत दागिने बनवून देण्याच्या बोलीवर आरोपींकडे सोपवले.

राजकोटमध्ये खोट्या गुन्ह्याची अन् जिवे मारण्याची धमकी

२० ते २५ दिवस उलटूनही आरोपींनी दागिने दिले नाहीत आणि त्यांचे फोनही बंद येऊ लागले. यामुळे सवईवाला हे २४ फेब्रुवारी २०२६ रोजी आपला मित्र मछिंद्र नलावडे याच्यासोबत राजकोटला गेले. तिथे विशाल आणि कल्पेश यांनी त्यांच्याकडील कामगारांनी सर्व सोने चोरून नेल्याचा बनाव रचला. सवईवाला यांनी पोलिसांत तक्रार देण्याची तयारी दर्शवताच, विशालच्या पत्नीने (पूजा झिंझुवडीगा) सवईवाला यांच्यावरच पतीच्या अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT