Bulldozers will run over the houses of 60 drug smugglers!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या अंमली पदार्थांचे जाळे मुळासकट उपटून टाकण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार आता मॲक्शन मोडफमध्ये येत त्यांनी अत्यंत आक्रमक पावले उचलली आहेत. शहरात ड्रग्जचा बाजार मांडणाऱ्या ६० सराईत गुन्हेगारांची यादीच पोलिसांनी तयार केली असून, त्यांची घरे आणि बांधकामे अनधिकृत असल्यास ती तातडीने जमीनदोस्त करण्यात यावीत, असे पत्र पोलिस आयुक्तांनी थेट महापालिका आयुक्तांना दिले आहे.
पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे ६० सराईत आरोपी अंमली पदार्थांची साठवणूक आणि विक्री करण्यासाठी स्वतःच्या राहत्या घराचा किंवा भाड्याने घेतलेल्या इमारतींचा वापर करत आहेत. यामुळे त्या-त्या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यातील अनेक बांधकामे ही अनधिकृत आणि बेकायदा असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.
एकएकावर २० ते २९ गुन्हे, टॉपच्या ७० गुन्हेगारांची यादी तयार
अंमली पदार्थ तस्करांनी नशेचा बाजार करताना दहशत माजवण्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि संघटित गुन्हेगारीचा आश्रय घेतल्याचे समोर आले ६० आहे. अशा ७० गुन्हेगारांची यादीही पोलिसांनी तयार केली आहे. अनिल माळवे (२९ गुन्हे), आदिल चाऊस (२३ गुन्हे), ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली यादव (२३ गुन्हे, पोक्सो, बलात्कारासह), सचिन त्रिभुवन (२१ गुन्हे), सय्यद फैजल ऊर्फ तेजा (१५ गुन्हे), अरबाज ऊर्फ गुड्डू देशमुख (१९ गुन्हे), जावेद खान (१५ गुन्हे), अशोक भालेराव (१५ गुन्हे), शेख अतिक (१४ गुन्हे), संजय चव्हाण (१६ गुन्हे), विक्रम पवार (११ गुन्हे), अनिस ऊर्फ बाबा खान (१२ गुन्हे), राहुल काळे (१० गुन्हे) आदींसह ७० आरोपींची कुंडली पोलिसांनी काढली आहे.
पोलिसांच्या रडारवर असलेले ६० सराईत ड्रग्ज तस्कर
महापालिकेला सादर केलेल्या यादीत खालील आरोर्षीचा समावेश आहे : १. शेख अशपाक पटेल (रा. रवींद्रनगर व शहाबाजार). २. अजय साळवे (रा. रवींद्रनगर), ३. अविनाश आणि अनिता पाचोंदे (रा. शहाबाजार), ४. सय्यद रहिम (रा. चंपा चौक). ५. मिर्झा सरफराज बेग (रा. रवींद्रनगर), ६. दाऊद मुनावर पठाण (रा. रवींद्रनगर), ७. शेख हाफीज (रा. चेलीपुरा), ८. इशरत अकीब शेख (रा. रवींद्रनगर), ९. अबुजर जफर खान (रा. किराडपुरा), १०. शेख कलीम सरदार (रा. रवींद्रनगर), ११. शेख मुस्ताक इसाक (रा. शहाबाजार), १२. सचिन त्रिभुवन (रा. हर्षनगर), १३. ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली यादव (रा. जयभवानीनगर), १४. सय्यद फैजल ऊर्फ तेजा (रा. किलेअर्क), १५. अजय आणि राणी ठाकुर (रा. सातारा गाव), १६. अनिल माळवे (रा. सावित्रीनगर), १७.
आदिल बिन चाऊस (रा. शहाबाजार), १८. अरबाज ऊर्फ गुड्डू देशमुख (रा. लेबर कॉलनी), १९. शेख अतिक (रा. चेलीपुरा), २०. अशोक भालेराव (रा. मिसारवाडी), २१. जावेद खान (रा. नूतन कॉलनी), २२. विक्रम पवार (रा. सातारा गाव), २३. अरुण माळवे (रा. सावित्रीनगर), २४. सय्यद अकील ऊर्फ अकील मालक (रा. छावणी बाजार), २५. विश्वनाथ ऊर्फ कोल्ह्या पिंपळे (रा. संजयनगर), २६. सागर देवकते (रा. कैलासनगर), २७. श्रीकांत बनसोडे (रा. चौधरी कॉलनी), २८. शेख असीफ (रा. रंगटीपुरा), २९. मिर शब्बिर (रा. लेबर कॉलनी), ३०. मोहम्मद वसीम (रा. काजीवाडा), ३१. सिकंदर खान ऊर्फ बब्बी (रा. आसेफिया कॉलनी), ३२. सद्दाम हुसेन (रा. शाहबाजार), ३३.
बाबू खान (रा. आसुरखाना, उस्मानपुरा), ३४. सागर खंडागळे (रा. नारेगाव), ३५. सचिन ठोंबरे (रा. न्यायनगर), ३६. शेख अकबर (रा. शहाबाजार), ३७. विशाल तामचीकर (रा. नारेगाव), ३८. सय्यद आरेफ (रा. जुना बाजार), ३९. सिध्देश्वर घायाळ (रा. चिकलठाणा), ४०. महेंद्र ऊर्फ पेंडी काळे (रा. टाऊन हॉल), ४१. राम धोंडू काळे (रा. उस्मानपुरा), ४२. मुराद खान (रा. उस्मानपुरा), ४३. राम गावडे (रा. गारखेडा परिसर), ४४. अब्दुल गफुर खान (रा. कैसर कॉलनी), ४५. शेरसिंग आणि रमाबाई इन्द्रेकर (रा. नारेगाव), ४६. शेख परवेझ शाहरुख (रा. असेफीया कॉलनी), ४७. शेख शोएब (रा. रेहमानिया कॉलनी), ४८. आवेज खान (रा. मोमीनपुरा), ४९. मोहम्मद ईद्रीस (रा. गरमपाणी), ५०. अमोल भालेराव (रा. मिसारवाडी), ५१. राहुल काळे (रा. जटवाडा रोड), ५२. अनिस ऊर्फ बाबा खान (रा. दर्गाजवळ), ५३. फेरोज खान (रा. शंभूनगर), ५४. शेख माजेद (रा. सादातनगर), ५५. शेख अझहर (रा. बायजीपुरा), ५६. राम काळे (रा. उस्मानपुरा), ५७. माजेद खान (रा. शहाबाजार), ५८. विजय दिनकर जाधव.
पोलिस बंदोबस्तात मनपाने हतोडा चालवावा
पोलिस आयुक्तांनी पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, उच्च न्यायालयाचे आदेश आणि महापालिकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही बेकायदेशीर बांधकामे तात्काळ निष्कासित करावीत. या कारवाईसाठी पोलिस विभागाकडून महापालिकेला चोख आणि कडेकोट बंदोबस्त पुरवण्यात येईल. आताया यादीतील मालमत्तांची तपासणी करून कधी कारवाई करणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.