Breakup anger! बुलढाण्याहून पाठलाग करत तरुणाने थेट गाठले संभाजीनगर Representative image
छत्रपती संभाजीनगर

Breakup anger! बुलढाण्याहून पाठलाग करत तरुणाने थेट गाठले संभाजीनगर

भररस्त्यात तरुणीचा विनयभंग ; क्रांती चौक पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Breakup anger! Chasing from Buldhana, the young man directly reached Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरून एका तरुणाने गावाकडून थेट छत्रपती संभाजीनगरपर्यंत तरुणीचा पाठलाग करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. निराला बाजार येथील क्लासवर जाऊन आणि नागेश्वरवाडी भागात भररस्त्यात तरुणीचा हात पकडून त्याने तिला पुन्हा संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. ही घटना मंगळवारी (दि.१) दुपारी घडली. याप्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र राजेंद्र झिने (२७, रा. गिरोली बुद्रुक, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी बुलढाणा जिल्हातील रहिवासी असून एकमेकांच्या चांगल्या ओळखीचे आहेत. एप्रिल २०२६ पासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, आरोपी महेंद्र याची वर्तवणूक चांगली नसल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यामुळे तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्याच्या त्रासाला आणि भीतीला कंटाळून तिने गाव सोडले आणि शिक्षणासाठी ती छत्रपती संभाजीनगर येथे निघून आली.

सध्या ती निराला बाजार भागातील एका खाजगी क्लासमध्ये शिकते. तरुणी शहरात निघून आल्यानंतरही आरोपीने तिचा पिच्छा सोडला नाही. तो तिचा शोध घेत थेट छत्रपती संभाजीनगर शहरात आला. मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) दुपारी १ वाजेच्या सुमारास त्याने निराला बाजार येथील अॅकॅडमी गाठली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी, बुधवारी (दि. २ सप्टेंबर) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तरुणी क्लासला जात असताना नागेश्वरवाडीत त्याने तिला गाठले. भररस्त्यात तिचा हात पकडून त्याने तिला स्वतः सोबत बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. या प्रकाराने प्रचंड घाबरलेल्या तरुणीने थेट क्रांती चौक ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक उत्तम जाधव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT