छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भाजपने दरवर्षाप्रमाणे यंदाही औरंगपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात महाआरती केली. त्यासोबतच जय श्रीराम, जय हनुमानच्या घोषणा देत उत्साहात शौर्य दिन साजरा केला.
यावेळी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केनेकर, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते ही महाआरती करण्यात आली. बाबरी मशीद विध्वंसनिमित्ताने भाजपच्या वतीने दरवर्षी ६ डिसेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने महाआरती घेण्यात येते.
यंदाही मोठ्या उत्साहात ही महाआरती घेण्यात आली. यावळी माजी महापौर भगवान घडमोडे, अनिल मकरिये, किरण पाटील, हर्षवर्धन कराड, दिलीप थोरात, महेश माळवदकर, सागर पाले, जालिंदर शेंडगे, कचरु घोडके, लक्ष्मीकांत थेटे, रामेश्वर भादवे, मिथुन व्यास, डॉ. उज्ज्वला दहिफळे, अमृता पालोदकर, साधना सुरडकर, योगेश वाणी, आशिष राठोड, लक्ष्मण शिंदे, सचिन मिसाळ, सिद्धार्थ साळवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जय श्रीराम, बजरंग बली की जयचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.