BJP ShivSena Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Politics|शिवसेना भाजपाने फोडले एकमेकांवर खापर

Chhatrapati Sambhajinagar Politics | युती तुटल्यानंतर दोघांकडून आरोप प्रत्यारोप, जशास तसे उत्तर देण्याचाही इशारा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुकारी वनसेवा : मंगळवारी (दि.३०)

शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. त्यांनतर महायुती कुणामुळे तुटली यावरून शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर खापर फोडले. भाजपच्या अहंकार आणि हट्टामुळेच युती तुटल्याचा आरोप शिवसेनेचे नेते व पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला. तर शिवसेनेतील अंतर्गत राजकारण आणि स्वकीयांना अॅडजेस्ट करण्यासाठी शिवसेने नेच युती तोडली, असे प्रत्युत्तर भाजपचे नेते व मंत्री अतुल सावे यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महापालिका निवडणुकीसाठी शिवसे नेसोबत युती व्हावी, यासाठी प्रयत्न केला. शेवटपर्यंत युतीधर्म पाळत प्राबल्य असलेल्या जागा देत ३७ चा प्रस्ताव दिला. परंतु शिवसेनेने शेवटपर्यंत भाजपला अंधारात ठेवले अन्नू प्रसार माध्यमातून युती तोडल्याचे कळाले.

प्रत्यक्षात ही युती शिवसेना नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे युती तुटली, असा आरोप ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे व खासदार डॉ. भागवत कराड यांनी केला. महापालिका निवडणुकीत युती व्हावी यासाठी दोन आठवड्यांपासून भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू होता. ७ ते ८ बैठकांनंतर शेवटी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने ज्या जागा वाटपावर सहमती दर्शविली. त्याप्रमाणेच सेनेला ३७ जागांचा प्रस्ताव पाठविला, परंतु त्यानंतर कोणताही प्रतिसाद शिवसेनेकडून आला नाही.

अनेकदा प्रस्तावात शिवसेना नेत्यांकडून बदल सुचविण्यात आले. ज्या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक आहेत, त्यापैकी अनेक जागांची मागणी त्यांच्याकडून झाली, त्यापैकी काही जागा दिल्या. परंतु सोमवारी प्रस्ताव दिल्यानंतरही पुन्हा नव्याने अन्य जागांची मागणी शिवसेनेकडून झाली.

खरे तर दिलेल्या प्रस्तावावर त्यांच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा होती. आम्ही सोमवारी सायंकाळपासून प्रतीक्षाच करत बसलो, परंतु शिवसेनेने थेट युती तोडल्याचे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत जाहीर केले. बातम्यातून ऐकल्यानंतर आम्हाला युती तुटल्याचे कळाले, असे मंत्री सावे यांनी सांगितले. शिवसेना नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे युती तुटली. शिवसेनेच्या नेत्यांना त्यांच्या जवळच्यांना आणि मुलांना अॅडजेस्ट करायचे होते, असा आरोपही मंत्री सावे यांनी केला.

शिवसेनेतच समन्वय नाही

खासदार डॉ. कराड म्हणाले की, शिवसेनेने युती तोडणे हे अनपेक्षित असल्याचे नमूद केले. प्रत्येक वेळेस प्रस्ताव बदलण्याची भूमिका शिवसेनेने घेतली. कधी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी, तर कधी खासदार संदीपान भुमरे यांच्यासह आमदार प्रदीप जैस्वाल व अन्य पदाधिकाऱ्यांनी जागा बदलाच्या सूचना केल्या. त्यांच्यातच एकमत होत नसल्याने त्यांच्या कार्यकत्यांनी गोंधळ घालत युती तोडण्याची मागणी केली. याच अंतर्गत वादामुळे युती तुटली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT