Marathas will get justice within the framework of law: Minister Abdul Sattar
मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत राज्य सरकार गांभीर्याने अब्दुल सत्तार यांचे विधान Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

मराठा आरक्षणाबाबत 10 दिवसांत मिळणार मोठी बातमी

करण शिंदे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून एकत्रितपणे पुढील 10 दिवसांमध्ये तुम्हाला मोठी बातमी मिळेल. तशी व्यवस्था सरकार तर्फे आम्ही करु, असे विधान राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी (दि.29) छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेमध्ये केले. कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून मराठा बांधवांना न्याय देता येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे मंत्री सत्तार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताने ते म्हणाले की, मनोज जरांगे हे राजकारणात नसले तरी आयकॉन आहेत. त्यांच्या मागे मराठा समाजाचा मोठा जनसमुदाय उभा आहे. सर्वजण त्यांना आपला आदर्श मानतात. मराठा आरक्षणासाठी त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू आहे. त्यांच्या मागणीबाबत राज्य सरकार गंभीर असून, हा विषय आता कारणी लावयाचा आहे.

आरक्षणाबाबत कोणी राजकारण करत असेल त्याच्याशी मला काही घेणे देणे नाही. एकच बोलायचे आहे की, ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठा बांधवाना कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून न्याय देता येईल. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सतत प्रयत्न सुरु आहेत. ते अधिकाऱ्यांच्या तासनतास बैठका घेत आहेत. तसेच विधी तज्ञांसोबत सातत्याने चर्चा करत आहेत. मराठा बांधवांना ते न्याय देतील असा आम्हाला शंभर ट्क्के विश्वास आहे. असेही सत्तार म्हणाले.

SCROLL FOR NEXT