सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण file photo
छत्रपती संभाजीनगर

Gold-Silver Prices : सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण

दिवाळीनंतर सोने प्रतितोळा १० हजारांनी तर, चांदी किलोमागे १७ हजारांनी स्वस्त

पुढारी वृत्तसेवा

Big drop in gold and silver prices

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनंतर सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. मागील दहा दिवसांत सोने प्रतितोळा १० हजार रुपयांनी स्वस्त होऊन १ लाख ३१ हजारांपर्यंत खाली आले आहे. तर चांदीची चकाकीही १७ हजार रुपयांनी कमी झाली आहे. चांदीचे भाव प्रतिकिलो १ लाख ८५ हजारांवरून १ लाख ६८ हजारांपर्यंत खाली आली आहे. आगामी काळात सराफा बाजारातील चढ-उताराकडे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

सुरक्षित गुंतवणूकीसाठी सोने-चांदी खरेदीला नेहमीच प्राधान्य दिले जाते. त्यातच मागील काही महिन्यांपासून अमेरिकन बँकिंग संकट आणि घडामोडीमुळे सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याने सोने-चांदीच्या दराने प्रचंड उसळी घेत दराचा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यामुळे सोने-चांदी खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचा विषय झाला होता.

दिवाळी पाडव्यात सोन्या-चांदीची जागतिकस्तरावरील जोरदार खरेदी झाल्यानंतर आता मागणी मंदावली आहे. दुसरीकडे जागतिकस्तरावरील घडामोडीमुळेही सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. शहरातील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव १ लाख ३१ हजार रुपये प्रति तोळा (अधिक जीएसटी) आणि एक किलो चांदीचा भाव १ लाख ६८ हजार रुपये अधिक जीएसटी नोंदवला गेला.

जागतिक घडामोडीचा परिणाम

सणासुदीनंतर सुरू असलेल्या घसरणीमागे नेमके काय कारण आहे, याबाबत बोलताना जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक म्हणाले, जागतिक स्तरावरील घडामोडीचा थेट परिणाम सराफा बाजारावर होऊन सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. दिवाळीचा सण संपल्यानंतर बाजारात मागणीत झालेली घट यामुळेही सोन्या-चांदीच्या दरांमध्ये नरमाई पहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT