Municipal Election : भाजपात उमेदवारीसाठी इच्छुकांमध्येच मोठी स्पर्धा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Municipal Election : भाजपात उमेदवारीसाठी इच्छुकांमध्येच मोठी स्पर्धा

प्रत्येक जागेसाठी १५ जणांचा दावा, उमेदवाराच्या निवडीसाठी पक्ष नेतृत्वाचा लागणार कस

पुढारी वृत्तसेवा

Big competition among those aspiring for BJP candidature

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आगामी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीत इच्छुकांमध्येच तीव्र स्पर्धा असून, प्रत्येक जागेसाठी ९ ते १५ इच्छुक असल्याचे रविवारी (दि.६) समोर आले. पक्षाकडून फार्म विक्रीच्या पहिल्या दिवशी ५१७ अर्ज घेतले गेल्याची माहिती समोर आली आहे. भाजप कार्यालयात झालेल्या गर्दीमुळे उमेदवाराची निवड करताना स्थानिक पदाधिकाऱ्यांसह पक्ष नेतृत्वाचा कस लागणार आहे.

महापालिका निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून, जानेव ारीमध्ये निवडणुका घेतल्या जाणार असल्याची चर्चा आहे. प्रत्येक पक्षाकडून यासाठी रणनीती आखली जात असून, भाजपकडून रविवारी उमेदवारी अर्जाचे वाटप करण्यात आले. यात एका जा गेसाठी तब्बल ९ ते १५ जण इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एवढ्या प्रमाणात उमेदवार इच्छुक असणे म्हणजे पक्षाअंतर्गत तीव्र स्पर्धचे निदर्शक मानले जात आहे.

दरम्यान भाजपकडून विकासकामे, समाजाभिमुख उपक्रम आणि संघटनबांधणीवर सातत्याने भर दिला जात आहे. त्यामुळे पक्षाची लोकप्रियता वाढल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात उसळलेल्या गर्दीने पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. या अर्जामध्ये व्यक्तिगत माहिती पक्षातील पूर्वीची जबाबदारी, लढलेल्या निवडणुका, सामाजिक क्षेत्रातील कार्य, स्थानिक संस्थेतील पद, प्रभागातील सामाजिक समीकरणे व मतदारसंख्या यासह तपशील विचारण्यात आल्याने निवड प्रक्रिया अधिक कसून होणार असल्याचे संकेत आहेत.

परंतु एवढ्या इच्छुकांमधून अंतिम निवड करताना पक्ष नेतृत्वावर मोठे दडपण येणार, हे स्पष्ट झाले आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे हे सर्व कार्यकर्ते पक्षशिस्त पाळ-णारे आहेत, असे सांगत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत असल्याचे दिसून येत आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज भरणाऱ्यांना निकोप स्पर्धा देण्याचा दावा कितपत व्यवहार्य ठरेल, याबाबत पदाधिकाऱ्यांतच संभ्रम आहे. कार्यकर्ते तळमळीने काम करत असल्याचा दावा असला, तरी उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांना पक्षाच्या निकषांचा टप्पा पार करावा लागणार आहे.

कार्यकर्त्यांत स्पर्धा

भाजपच्या विकास आणि संघटनबांधणीच्या दाव्यांवर उमेदवारीच्या गर्दनिच प्रश्न निर्माण केले असून, पक्षात शिस्त असूनही तळागाळातील स्पर्धा किती तीव्र आहे, याचे वास्तवच यानिमित्ताने ठळकपणे दिसून आले आहे. आगामी निवडणुकीपर्यंत ही भाऊगर्दी कोणत्या दिशेने वळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT