Sabudana Ganesha : ८० किलो साबुदाण्यापासून साकारला बाप्पा  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sabudana Ganesha : ८० किलो साबुदाण्यापासून साकारला बाप्पा

मुलमची बाजार गणेश मंडळाच्या १४ फूट उंच मूर्तीचे आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

Bappa made from 80 kg of sabudana

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुलमची बाजार येथे शिवसेना गणेश मंडळाने यंदा ८० किलो साबुदाण्यापासून १४ फूट उंच गणेशमूर्ती साकारली आहे. यासाठी ४५ बांबू, २० किलो डिंक आणि १५० मीटर कापडही वापरण्यात आले आहे. गणरायाची ही भव्य मूर्ती शेकडो गणेशभक्त, भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

मागील ३० वर्षांपासून म्हणजेच १९९६ पासून शिवसेना गणेश मंडळातर्फे बांबूपासून मूर्ती तयार करण्याची प्रथा आहे. यापूर्वी कडधान्यापासून श्रींची मूर्ती तयार करण्यात आली आहे. गेल्या वर्षी बडीसौफपासून १२ फूट उंच श्रींची मूर्ती साकारण्यात आली होती. गणरायाचे हे रूप बघण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती.

गणेशभक्तांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याने गणेश मंडळाचाही उत्साह वाढला. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात मंडळाच्या सर्व सदस्यांनी साबुदान्यापासून भव्य गणेशमूर्ती तयार करण्याचे ठरवले. त्यानुसार मंडळाचे मूर्तीकार आनंद जातेकर, गोविंदा जातेकर, आमन कंचनकर, स्वप्निल चौधरी यांनी तीन महिन्यांत मोठ्या भक्तिभावाने ८० किलो साबुदाण्यापासून १४ फूट उंच गणरायांची मूर्ती साकारली. मंडळाचे अध्यक्ष सागर कंचनकर, उपाध्यक्ष राहुल सरदे, सचिव सनी पारसवार, कोषाध्यक्ष उमेश पय्येवाल यांच्यासह गौरव कुंचलकुंठे, विकी पारसवार, शिवा शिंदे यांनीही परिश्रम घेतले.

गणेशभक्तांकडून भरभरून प्रतिसाद

दरवर्षी शिवसेना गणेश मंडळाकडून बाप्पाचे नवे रूप साकारले जाते. शहरासह जिल्ह्याबाहेरील गणेशभक्तांना याचे मोठे आकर्षक असते. यंदाही गणेशभक्तांकडून साबुदान्याच्या रूपातील गणरायाची मूर्ती बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. बच्चेकंपनीकडूनही भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT