PM Awas Home Loans : पीएम आवासच्या गृहकर्जासाठी बँका सरसावल्या file photo
छत्रपती संभाजीनगर

PM Awas Home Loans : पीएम आवासच्या गृहकर्जासाठी बँका सरसावल्या

सभापती मकरियेंच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन, पदाधिकारी, अधिकाऱ्यांचा पुढाकार

पुढारी वृत्तसेवा

Banks Step Up for PM Awas Home Loans

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात विविध चार ठिकाणच्या जागांवर पाच गृहप्रकल्प तयार करीत आहे. यातील हसूलच्या गटनंबर २१६ मधील बहुमजली प्रकल्पातील ५०४ सदनिकांसाठी पहिल्या टप्प्यात ३५० लाभार्थ्यांची निवड झाली आहे.

त्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने शनिवारी आयोजित केलेल्या विशेष गृहकर्ज मेळाव्याचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त अॅड. अपणी थेटे, सारा बिल्डरचे सीताराम अग्रवाल, नीलेश अग्रवाल, पीएमसीचे लक्ष्मीकांत सुर्वे, स्वप्निल श्रॉफ यांची उपस्थिती होती. महापालिकेने शहराच्या विविध ४ ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ५ प्रकल्प राबवित आहे.

या बहुमजली गृहप्रकल्पांच्या कामाला गती आली असून सुमारे ११ हजारांहून अधिक सदनिका बांधण्यात येणार आहेत. यात हसूल येथे गट क्रमांक २१६ मधील ५०४ सदनिकांच्या प्रकल्पासाठी लक्की ड्रॉमध्ये पात्र ठरलेल्या ३५० लाभार्थ्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शनिवारी बँकांचा विशेष मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्याच्या उद्घाटनावेळी सभापती मकरिये म्हणाले की, प्रकल्पाचे काम वेगात पूर्ण होण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी दहा टक्के पैसे तातडीने जमा करावे. वर्षभरात लाभार्थ्यांना तयार घराच्या चाव्या मिळतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

लाभाथी, विकासक, मनपा प्रशासन आणि विविध बँकांचे प्रतिनिधी यांना एकाच छताखाली आणून नागरिकांना गृहकर्ज प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि सहज पद्धतीने पूर्ण करता यावी, हा मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. यावेळी बँक प्रतिनिधींनी गृहकर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, व्याजदर, मासिक हप्ते तसेच कर्ज मंजुरी प्रक्रियेबाबत लाभार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी मनपा प्रधानमंत्री आवास योजना विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT