'क्लोजिंग डे'साठी आज बँका बंद File Photo
छत्रपती संभाजीनगर

'क्लोजिंग डे'साठी आज बँका बंद

आर्थिक वर्षाच्या अखेरीस बँकांच्या क्लोजिंगच्या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Banks Closed Today for 'Closing Day'

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: आर्थिक वर्षाच्या अखेरीस बँकांच्या क्लोजिंगच्या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे आज बुधवारी (दि.१) सार्वजनिक सुटी नसली तरी शहरातील बहुतांश बँका क्लोजिंग डेच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, मंगळवारी (दि.३१) महावीर जयंतीची सार्वजनिक सुटी असतानाही बँकाअंतर्गत कामकाजासाठी सुरू होत्या.

आर्थिक वर्षअखेरच्या ताळेबंद, हिशेब तपासणी आणि लेखापरी क्षणाशी संबंधित कामांमुळे बँकांचे व्यवहार बुधवारी ग्राहकांसाठी बंद असणार आहेत. कोणतीही सार्वजनिक सुटी नसतानाही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. अनेक राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांनी शाखांमध्ये नियमित व्यवहार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांनी रोख व्यवहार, धनादेश जमा, खाते उघडणे यासारख्या सेवांसाठी गुरुवारी किंवा कामकाजाच्या दिवशीच शाखांमध्ये यावे, असे आवाहन बँकांकडून करण्यात आले.

बँकांचा क्लोजिंग डे असल्यामुळे सर्व बँकांना सुटी राहणार आहे आज महावीर जयंती असली तरी मात्र आरबीआयच्या आदेशानुसार बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. बुधवारी बँका बंद असून, गुरुवारी मात्र नेहमीच वेळेत बँकांचे व्यवहार सुरू होतील.
एस. जी. पाटील, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT