Bakri Eid celebrated with enthusiasm in Sillod
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :
सिल्लोड शहरात (बकरी ईद सण) ईद उल अजाह सण उत्साहात साजरा झाला. ईदनिमित्त मुस्लिम बांधवानी शहरातील ईदगाह येथे सामूहिकरीत्या इमाम हाफीज अब्दुल कादर यांच्या इमामात मार्गदर्शनात नमाज अदा केली. सकाळी ८:३० वाजता ईदगाह येथे ईदच्या नमाजला सुरुवात झाली होती. बकरी ईदच्या नमाजसाठी मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
ईद गहाच्या मैदानावर बकरी ईदची नमाज अदा केल्यानंतर आ. अब्दुल सत्तार यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक अन्न पूर्णा सिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, बँकेचे अध्यक्ष अर्जुन पा. गाढे, बाजार समितीचे सभापती विश्वासराव दाभाडे, माजी सभापती पा. साळवे यांनी उपस्थित मुस्लिम हिन्दू बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. दिवसभर सर्वत्र ईदचा उत्साह पहायला मिळाला. तर संपूर्ण शहरात सर्वधर्मीय बांधव एकमेकांना गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा देताना दिसले.
ईदगाह येथे बकरी ईद निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अन्न-पूर्णा सिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, पोलिस निरीक्षक शेषराव उदार, सपोनी बाबू मुंढे यांच्यासह पंचायत समितीचे माजी सभापती श्रीरंग साळवे, माजी उपनगराध्यक्ष नंदकिशोर सहारे, शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, माजी नगरसेवक शांतीलाल अग्रवाल, चेअरमन रमेश साळवे, संचालक गणेश ढोरमारे, राजेंद्र ठोंबरे, पोना रामानंद बुधवंत, पगारे शिवसेना व विविध पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी व सर्वधर्मीय नागरिकांची उपस्थिती होती.