बायजीपुरा उपकेंद्र : ग्राहकांना मिळणार अखंडित वीज पुरवठा File Photo
छत्रपती संभाजीनगर

बायजीपुरा उपकेंद्र : ग्राहकांना मिळणार अखंडित वीज पुरवठा

१० एमव्हीएचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित

पुढारी वृत्तसेवा

Baijipura Substation: Consumers to Receive Uninterrupted Power Supply

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने बायजीपुरा उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ केली. महापौर समीर राजुरकर यांच्या हस्ते १० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर शनिवारी (दि. ४) रात्री कार्यान्वित करण्यात आला. यामुळे सुमारे १५ ते २० हजार वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

या उपकेंद्रातील ५ एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करून तो १० एमव्हीए करण्यात आला. शनिवारी १० एमव्हीए क्षमतेचा सुमारे ११ टन वजनाचा महाकाय ट्रान्सफॉर्मर अभियंते, कर्मचाऱ्यांनी १० तास अथक परिश्रम घेऊन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बसवला.

सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर रात्री ८ वाजता सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला. ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करताना महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती मकरिये, विरोधी पक्ष नेते समीर साजेद यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कमर्चारी उपस्थित होते.

२० एमव्हीएची क्षमता

आता उपकेंद्रातील दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता २० एमव्हीए झाल्याने ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे. यात जिन्सी, रोशनगेट, शहाबाजार, जुना बाजार, शहागंज, बांबू मार्केट, जाफरगेट, जुना मोंढा, अहिंसानगर, बायजीपुरा, संजयनगर व बायजीपुरा आदी वसाहतीतील ग्राहकांना लाभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT