Awareness campaign for Maratha reservation to be launched in December
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असून, सरकारच्या निर्णयांमुळे समाजाची दिशाभूल होत असल्याचा आरोप मराठा आरक्षण समन्वयक रमेश केरे यांनी केला. या पार्श्वभूमीवर डिसेंबरपासून मराठवाड्यात आरक्षण जनजागृती यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुळजापूर येथून सुरू होणाऱ्या यात्रेचा समारोप कायगाव येथे होणार असल्याचे केरे यांनी सोमवारी (दि. १६) स्पष्ट केले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देवळाई परिसरात निमंत्रितांची राज्यस्तरीय 'मराठा आरक्षण मंथन परिषद' झाली. परिषदेत मराठवाड्यातील निमंत्रितांनी आरक्षणाच्या सद्यस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात आली.
हैद्राबाद गॅझेटिअर, एसईबीसी आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राबाबत सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री आणि आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मराठवाड्यातील अभ्यासक आणि समन्वयकांची बैठक घेण्याचे आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. मात्र, अद्याप बैठक झालेली नाही. राज्यात ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्याचा सरकारचा दावा आहे.
या नोंदी मराठवाड्यातील की संपूर्ण राज्यातील, हे स्पष्ट करण्यासोबतच त्या १९६७ नंतरच्या आहेत का, याचाही खुलासा सरकारने करावा, अशी मागणी केरे यांनी केली. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याऐवजी समित्या आणि आयोग नियुक्त करून तो लांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारची ही भूमिका समाजासमोर मांडण्यासाठी यात्रा काढण्यात येणार आहे. आरक्षणाचा संघर्ष मराठवाड्यातून सुरू झाल्याने पहिल्या टप्प्यात याच भागात जनजागृती केली जाणार आहे, असे सांगण्यात आले. यावेळी राजेंद्र दाते पाटील, नानासाहेब जावळे, किशोर चव्हाण, डॉ. शिवानंद भानुसे, भीमराव मराठे, गणेश कदम, राहुल पाटील आदी उपस्थित होते.
समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न थांबवा : जावळे, केरे सरकारचे काही प्रतिनिधी संघटनांना बदनाम करून मराठा समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमचा रोष सरकारच्या धोरणांवर आहे, असे नानासाहेब जावळे यांनी सांगितले. मनोज जरांगे आणि आम्ही एकाच उद्देशाने आरक्षणासाठी लढत आहोत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यांनी यात्रेत सहभागी व्हावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे केरे यांनी स्पष्ट