Sambhajinagar News ; वीस दिवसांत दुप्पट परताव्याचे आमिष; तीन आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडी

गेट वे अॅप हेल्प या कंपनीच्या अॅपद्वारे १६९ गुंतवणूकदारांची फसवणूक
Sambhajinagar News
Sambhajinagar News ; वीस दिवसांत दुप्पट परताव्याचे आमिष; तीन आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडीfile photo
Published on: 
Updated on: 

The lure of a double return in twenty days; Police custody of three accused for ten days

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गेट वे अप हेल्प या कंपनीच्या वेबसाईटवरील अॅपद्वारे गुंतवणुकीसाठी दररोज १० टक्क्यांप्रमाणे २० दिवसात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात अटक असलेल्या संदीप शिवदास जाधव, आशा सखाराम देवकर व प्रतिभा आशिषकुमार पांडे (शुक्ला) यांना विशेष न्यायाधीश पी. पी. राजवैद्य यांनी दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar Bibi Ka Makbara|रंगांच्या जादुई दुनियेत न्हाऊन निघाला बीबी का मकबरा

सहायक लोकअभियोक्ता कैलास पवार यांनी आरोपी व फिर्यादी यांचे व्हॉट्स अॅप ग्रुपप्रमाणे १६९ गुंतवणूकदार असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, हे गुंतवणूकदार वेगवेगळ्या शहरांमधील आहेत. त्यांना संपर्क करून गुंतवणूक केलेल्या रक्कमेबाबत माहिती घेणे बाकी आहे, या प्रकरणात वेबसाईट तयार करणाऱ्या अजय कावा यास वडोदरा येथे जाऊन अटक करावयाची असून, तपास बाकी आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar Crime News ; बाहेरगावी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचे घर फोडून १८ तोळे सोने लंपास

गुंतवणूकदारांकडून घेतलेली रक्कम नेमकी कुठे गुंतवणूक केली, किती व कोठे मालमत्ता आहे, ती कोणा-कोणाच्या नावे खरेदी केलेली आहे याची माहिती घेऊन हस्तगत करणे आहे, मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत उघडलेल्या कार्यालयाचे भाडे मासिक १ लाख ७५ हजार एवढे असल्याचे समोर आले असून, या गुन्ह्यात इतर सहभागी आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करणे असल्याचे म्हणणे मांडत अटकेतील तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.