Chhatrapati Sambhajinagar Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar crime : क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेड

सिटी चौक पोलिस ठाण्यात आरोपी संदेश अनिल म्हस्के (रा. किलेअर्क) विरुद्ध पोक्सो व विविध कलमांखाली गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : औरंगपुरा भागात टायपिंग क्लासला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिची छेडछाड काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्राम आयडी मागत अश्लील इशारे करणाऱ्या या आरोपीला मुलीच्या वडिलांनी जाब विचारला असता त्याने त्यांना थेट चाकूने मारून टाकण्याची धमकी दिली.

या प्रकरणी मुलीच्या काकूने दिलेल्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात आरोपी संदेश अनिल म्हस्के (रा. किलेअर्क) विरुद्ध पोक्सो व विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हस्केला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, त्याची न्यायालयाने हर्सूल कारागृहात रवानगी केली.

पीडित अल्पवयीन मुलगी औरंगपुरा येथील एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये टायपिंग क्लाससाठी जाते. शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तिचा क्लास सुटल्यानंतर ती बाहेर आली. त्यावेळी आरोपी संदेश म्हस्के हा क्लासबाहेर उभा होता व तो तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याचवेळी मुलीला घेण्यासाठी तिचे वडील तिथे आले. एक तरुण आपल्या मुलीकडे सारखा पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT