Atul Save : खंडणीसाठी गुंडांचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला file photo
छत्रपती संभाजीनगर

Atul Save : खंडणीसाठी गुंडांचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

मंत्री अतुल सावे यांचा गंभीर आरोप : बुलेटच्या रॉडने मारहाण, खिशातील पैसेही लुटले

पुढारी वृत्तसेवा

Atul Save: Goons fatally attack nephew for ransom

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बिडकीन परिसरातील खंडेवाडी येथे शेतरस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीला आता वेगळे वळण मिळाले आहे. हा केवळ रस्त्याचा वाद नसून, स्थानिक गुंडांनी खंडणी उकळण्याच्या उद्देशाने माझ्या पुतण्यावर केलेला हा पूर्वनियोजित आणि जीवघेणा हल्ला आहे, असा गंभीर आरोप राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी केला आहे. या अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अमेय सावे यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सावे यांनी दिली.

या घटनेबाबत माध्यमांना माहिती देताना मंत्री सावे म्हणाले की, माझ्या पुतण्याचा खंडेवाडीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून काँक्रीटचा प्लांट आहे. आजवर त्याचे काम लोकांनी तिथे गाड्या आणल्या आणि इथून गाडी घेऊन असलेल्या माझ्या भावाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न सोडवू, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊ किंवा तुम्हाला हवी मात्र, त्या गुंडांनी काहीही न ऐकता माझ्या भावाला

बुलेटचा रॉड अन् लोखंडी कड्याने वार

वडील अजित सावे यांना धक्काबुक्की होत असल्याचे पाहून पुतण्या अमेय जेव्हा गुंडांना समजवायला गेला, तेव्हा त्यांनी थेट त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. एकाने बुलेट गाडीच्या रॉडने, तर दुसऱ्याने हातातील लोखंडी कड्याने अमेयच्या डोक्यात जबर वार केले. यात त्याच्या डोक्याला मोठी जखम झाली. त्याला तातडीने आधी सरकारी रुग्णालयात नेऊन टाके घालण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्याला आता सिग्मा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. सध्या तो डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्याची प्रकृती गंभीर आहे, असे सावे म्हणाले.

खिशातील पैसेही लुटले

या औद्योगिक पट्टचात दहशत माजवून खंडणी वसूल करणे, हा या गुंडांचा नित्याचाच उद्योग आहे. याच गुन्हेगारी प्रवृत्तीतून त्यांनी हा हल्ला केला. मारहाणीदरम्यान या गुंडांनी माझ्या भावाच्या खिशातील पैसेही हिसकावून घेतले. तसेच, आमच्या गाडीच्या चालकाला जातीवाचक शिवीगाळही केली. आम्हाला या जातीवाचक राजकारणात पडायचे नसले तरी हा संपूर्ण प्रकार अत्यंत संतापजनक आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तातडीने कारवाई झालीच पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया मंत्री सावे यांनी नोंदवली.

कारवाईची मागणी

या घटनेचे सर्व फोटो आणि व्हिडीओ पोलिसांना दिले असून, त्यात हल्लेखोर स्पष्टपणे दिसत आहेत. त्यांना वाटले असावे की थोडी दादागिरी करून बघू, पण रॉडच्या मारहाणीमुळे अमेयच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. या गंभीर प्रकरणाबाबत आपण स्वतः पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक आणि विशेष पोलिस महानिरीक्षकांशी बोललो असून, या हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी केल्याचेही मंत्री सावे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT