Crime News : सासूच्या अंगावर दुचाकी घालून ठार मारण्याचा प्रयत्न file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : सासूच्या अंगावर दुचाकी घालून ठार मारण्याचा प्रयत्न

पत्नीला सतत दारू पिऊन मारहाण करणाऱ्या जावयाने, समजावण्यासाठी गेलेल्या सासूच्या अंगावर थेट भरधाव दुचाकी घातली.

पुढारी वृत्तसेवा

Attempt to kill mother-in-law by running a two-wheeler over her

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पत्नीला सतत दारू पिऊन मारहाण करणाऱ्या जावयाने, समजावण्यासाठी गेलेल्या सासूच्या अंगावर थेट भरधाव दुचाकी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि.६) सकाळी १० वाजेच्या सुमारास हनुमान नगर, गल्ली नं. २ भागात घडली. याप्रकरणी जखमी सासूच्या तक्रारीवरून जावयाविरुद्ध जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश नवनाथ ढोकळे (३३, रा. इंदिरानगर, पैठण) असे आरोपी जावयाचे नाव आहे.

फिर्यादी मीना सचिन गोरे (४५, रा. गल्ली नं. २, हनुमान नगर, मूळ रा. पैठण) यांच्या तक्रारनुसार, त्यांच्या मोठ्या मुलीचा २०२२ मध्ये योगेश ढोकळे सोबत विवाह झाला होता. मीना या चार वर्षांपासून मुलांच्या शिक्षणासाठी शहरात राहायला आल्या होत्या.

तर मागील दोन महिन्यांपासून त्यांचा जावई योगेश हा पत्नी आणि दोन मुलांसह विजयनगर भागात रूम करून राहतो. योगेश हा पत्नीला वारंवार दारू पिऊन मानसिक व शारीरिक त्रास देत होता. सोमवारी रात्री २ वाजता त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले, त्यामुळे वैतागलेली त्याची पत्नी दोन मुलांसह मध्यरात्रीच आईकडे हनुमान नगर येथे निघून आली होती.

मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास योगेश हा पत्नीला परत नेण्यासाठी त्याची पल्सर दुचाकी (एमएच-२०-सीझेड-६२९३) घेऊन मीना यांच्या घरी आला. तो पत्नीला शिवीगाळ करू लागला. यावेळी सासू मीना गोरे, त्यांची नणंद आणि शेजारील एका महिलेने योगेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागाच्या भरात योगेशने तुला जीवे ठार मारतो अशी धमकी देत पल्सर गाडी जोरात रेस केली आणि सासूमीना यांच्या थेट अंगावर घातली. या जोरदार धडकेमुळे मीना या जमिनीवर कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला तसेच कमरेला गंभीर मार लागला. गुन्ह्याचा तपास जवाहरनगर पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT