Sambhajinagar Crime : अत्याचारातील पीडितेला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीचा प्रयत्न File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : अत्याचारातील पीडितेला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीचा प्रयत्न

गजाननमंदिर परिसरातील घटना; पीडितेला मारहाण

पुढारी वृत्तसेवा

Attempt to coerce victim by threatening her with a knife

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा देवदर्शन घेऊन मंदिराबाहेर पडलेल्या २६ वर्षीय तरुणीला वकिलाने जबरदस्तीने कारमध्ये ओढून चाकूच्या धाकावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरुवारी (दि.४) रात्री १० वाजेच्या सुमारास गजाननमंदिर परिसरात घडला. महेंद्र भगवान नैनाव (रा. उत्तरानगरी) असे आरोपी वकिलाचे नाव असून, त्याच्याविरोधात यापूर्वी पीडित तरुणीने आठ ते नऊ तक्रारी नोंदविल्या असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याच तरुणीच्या तक्रारीवरून नैनाव याच्यावर बलात्काराचा गुन्हाही दाखल आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, पीडिता विधी शाखेच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. गुरुवारी रात्री पीडिता गजाननमंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन करून ती मंदिराबाहेरील चप्पल स्टॅण्डजवळ उभी असताना महेंद्र नैनाव तेथे आला. त्याने अचानक तिचा हात पकडून ओढत पुलाकडे नेले आणि एका दुकानामागे उभ्या केलेल्या कारमध्ये जबरदस्तीने ढकलले.

दरवाजे बंद करून त्याने चाकू दाखवत स्वतःच्या हाताची नस कापेन, केस मागे घे नाही तर तुझा जीव घेईन, अशी धमकी दिली. नैनाव याने नातेवाईक वकील आणि सिनीयर वकील यांनी आम्ही तुला काही होऊ देणार नाही, तू तिचा काटा काढ, असे म्हटले असल्याचे सांगत धमक्या देत पीडितेला मारहाण केली. तसेच जबरदस्तीने शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तिच्या डाव्या हाताला मार लागल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे.

मंत्र्यांसोबतचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी केस मागे घे नाही तर जीव घेईन, तुझे आणि स्थानिक एका मंत्र्यांचे नाव घेत त्यांच्यासोबतचे तुझे व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी दिल्याचेही पीडितेने फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या पीडितेने आरोपीच्या होला हो मिळवत कशीबशी आपली सुटका करून घेतली. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार सुनील म्हस्के करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT