Crime News :  file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : पैसे मागितल्याच्या रागातून भावाच्या कुटुंबावर हल्ला; पिता-पुत्राला ५ वर्षे सक्तमजुरी

विहिरीत टाकलेल्या नवीन पाईपचे पैसे मागितल्या कारणाने भावासह त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या भावासह मुलाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.

पुढारी वृत्तसेवा

Attack on brother's family out of anger for asking for money; Father and son sentenced to 5 years of hard labor

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विहिरीत टाकलेल्या नवीन पाईपचे पैसे मागितल्या कारणाने भावासह त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या भावासह मुलाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. प्रकरणात आरोपी पितापुत्राला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोरवाडे यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी २५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. इमरान अकबर पठाण (२७) आणि अकबर उस्मान पठाण (५५, दोघे रा. शिल्पनगर, बीड बायपास रोड सातारा) अशी आरोपी पितापुत्राची नावे आहेत.

प्रकरणात समीर बादशहा पठाण (२०, रा. शिल्पनगर, बीड बायपास) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादीचे वडील बादशहा पठाण व त्यांचा भाऊ अकबर पठाण या दोघांचा पाणी विक्रीचा व्यवसाय आहे. दोघे संयुक्त विहिरीतून पाणी काढून ते विक्री करतात. २२ जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फिर्यादीचे वडील व चुलता हे विहिरीजवळ बोलत उभे होते. त्यावेळी बादशहा पठाण यांनी विहिरीत नवीन पाईप टाकला आहे, त्याचे पैसे दे आणि विहिरीतून पाणी भरा असे अकबर पठाण याला म्हणाले. त्यावर अकबर पठाण याने, पैसे देत नाही असे म्हणत शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली.

त्याचवेळी अकबर पठाणचा मुलगा इमरान याने लोखंडी रॉडने बादशहा पठाणला जबर मारहाण केली. फिर्यादी व त्याची आई भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनादेखील आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण केली.

तसेच अकबर पठाण याच्या पत्नीने फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केली. तर आरोपी इमरान याने फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन सहायक निरीक्षक सुनील कहऱ्हाळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाच्या सुनावणीवेळी सहायक लोकभियोक्ता राजू पहाडिया यांनी आठ साक्षीदार तपासले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी पितापुत्राला दोषी ठरवून दोघांना ५ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी २५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून सय्यद मुख्तर आणि सलमान शेख यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT