अजिंठा अर्बन बँकेसह यशस्विनी पतसंस्थेची ७५ कोटींची मालमत्ता सील file photo
छत्रपती संभाजीनगर

अजिंठा अर्बन बँकेसह यशस्विनी पतसंस्थेची ७५ कोटींची मालमत्ता सील

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; ठेवीदारांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

Assets worth Rs 75 crore of Ajanta Urban Bank and Yashaswini Patsanstha sealed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि यशस्विनी महिला स्वयंसहाय्यता गटाची सहकारी पतसंस्था यांच्या संचालकांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने फास आवळला आहे.

या दोन्ही संस्थांच्या २९ आणि ६१ अशा एकूण ९० मालमत्तांसह बैंक खात्यातील तब्बल ७५.९ कोटी रुपयांची मालमत्ता एमपीआयडी कायद्यान्वये जप्त करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सोमवारी (दि. ३०) दिली.

या मालमत्तांच्या विक्रीतून ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले आणि सहाय्यक आयुक्त अशोक रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक मोसीन सय्यद, ज्ञानेश्वर अवघड, उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, गणेश शिंदे, किशोर महाजन, विजय गवळी, बाळासाहेब राठोड, प्रभाकर राऊत, संदीप जाधव, मुक्तार शेख यांच्या पथकाने केली.

आणखी मालमत्तांचा शोध सुरू

दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींशी संबंधित आणखी मालमत्ताचा शोध आर्थिक गुन्हे शाखेकडून घेण्यात येत आहे. त्या मालमत्तासंदर्भातही एमपीआयडी कायद्यान्वये पुरवणी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचेही पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT