Crime News : मित्र कुठे आहे?' विचारल्याने तरुणाचा हात केला फॅक्चर file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : मित्र कुठे आहे?' विचारल्याने तरुणाचा हात केला फॅक्चर

पडेगावातील चैतन्यनगरमधील घटना; दगडफेक करत दांड्याने बेदम मारहाण

पुढारी वृत्तसेवा

Asking 'Where is your friend?' leads to a young man suffering a fractured arm

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : माझा मित्र कुठे आहे? अशी साधी विचारणा केल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करत त्याच्या पाठीवर दगड फेकून मारला, तसेच दांड्याने बेदम मारहाण करून त्याचा डावा हात फॅक्चर केला. ही घटना शुक्रवारी (दि.९) रात्री ८ वाजेच्या सुमारास पडेगाव परिसरातील चैतन्यनगर येथे घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या हातावर घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून रॉड बसवण्यात आला आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात शेख रिजवान आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सतीश देवनाथ शिंदे (२६, रा. रा. तलावाडी, ता. कन्नड) याच्या तक्रारीनुसार, तो हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतो. पडेगाव येथील चैतन्यनगर येथे राहणाऱ्या काकू सरलाबाई शिंदे यांच्या घरी पितृपक्षातील कार्यक्रमासाठी आला होता. शुक्रवारी (दि. ९) रात्री आठ वाजेच्या सुमारास काकूंनी घरगुती किराणा सामान आणण्यासाठी सांगितल्याने सतीश चैतन्यनगर भागातील पार्थ किराणा दुकानाजवळ गेला होता.

तेथे उभ्या असलेल्या एका मुलाला त्याने सहज विचारले की, माझा मित्र तलाह कुठे आहे? मित्राबद्दल विचारणा केल्याचा राग आल्याने शेख रिजवान याने सतीशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद नको म्हणून सतीश मोटारसायकलवर बसून निघून जात असताना, रिजवानने त्याच्या पाठीवर दगड फेकून मारला. त्यानंतर रिजवानचा आणखी एक साथीदार तिथे आला. दोघांनी मिळून सतीशला मारहाण सुरू केली. तू मला ओळखतो का? तू आम्हाला तलाहबाबत विचारणा का केली? असा दम भरत दांड्याने मारहाण करत त्याचा डावा हात फॅक्चर केला. या प्रकरणाचा पुढील तपास अंमलदार सुनिता दराडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT