'लुडो'च्या खेळात 'पेनल्टी'च्या २०० रुपयांवरून रिक्षाचालकांमध्ये राडा; भांडण सोडविणाऱ्याला भोसकले file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : 'लुडो'च्या खेळात 'पेनल्टी'च्या २०० रुपयांवरून रिक्षाचालकांमध्ये राडा; भांडण सोडविणाऱ्याला भोसकले

जयभवानी नगरमधील घटना; पुंडलिकनगरात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Argue among rickshaw pullers over Rs 200 'penalty' in Ludo game

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मोबाईलवर पैशांची पैज लावून 'लुडों' खेळताना हरल्यानंतर 'पेनल्टी'चे अवघे २०० रुपये न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून रिक्षाचालकांमध्ये चांगलाच राडा झाला. चाकूने हल्ला चढवल्याने भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थीला आलेल्या मयूर चिल्लोरकर या तरुणाच्या पोटात आरोपीने चाकू खुपसला.

तर दुसऱ्याच्या मांडीवर वार केला. ही ही घटना मंगळवारी (दि.१) रात्री ९ वाजेच्या सुमारास जयभवानी नगर, टीजेएसबी बँकेच्याजवळ घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर केशव हिरवे असे आरोपीचे नाव आहे.

रिक्षाचालक वैभव रावसाहेब जाधव (२७, रा. पडेगाव, मिटमिटा) याच्या तक्रारीनुसार, मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास जयभवानी नगर येथील यश हाईट्स टॉवरजवळील टीजेएसबी बँकेच्या ओट्यावर त्याचे मित्र कलीम शेख, सचिन आबुज आणि आरोपी परमेश्वर हिरवे यांच्यासोबत मोबाईलवर पैशांवर लुडो गेम खेळत बसले होते. या खेळात परमेश्वर जिंकला, तर वैभवसह इतर दोन मित्र हरले. त्यामुळे तिघांनीही ठरल्याप्रमाणे परमेश्वरला शंभर-शंभर रुपये दिले.

मात्र, जिंकलेल्या परमेश्वरने 'तुझ्यावर पेनल्टीचे २०० रुपये बसले आहेत, ते मला जास्त दे,' अशी मागणी वैभवकडे केली. वैभवने आपल्याकडे आणखी पैसे नसल्याचे सांगत २०० रुपये देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने परमेश्वर संतापला. 'तुला पैसे द्यावेच लागतील, नाहीतर जिवंत मारून टाकतो,' अशी धमकी देत त्याने खिशातून चाकू काढला आणि वैभवच्या अंगावर धावून गेला. या झटापटीत वैभवचा मित्र मयूर चिल्लोरकर हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला. मात्र, संतापलेल्या परमेश्वरने मयूरला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटात थेट चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले.

आपल्या मित्रावर वार होत असल्याचे पाहून वैभवने परमेश्वरची कॉलर पकडून त्याला खाली ओढले असता, त्याने वैभवच्या डाव्या पायाच्या मांडीवरही चाकूने वार करून त्याला जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT