Sillod News : खंडाळ्यात सावकाराच्या घरावर छापा, सहा खरेदी खत, तीन चेक जप्त

एका बेकायदा खासगी सावकाराच्या घरावर छापा मारून सहा खरेदी खत, तीन कोरे चेक व एक हस्तलिखित डायरी जप्त करण्यात आली.
Police Raid
Police RaidPudhari
Published on
Updated on

Moneylender's house raided in Khandala, three checks seized

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : एका बेकायदा खासगी सावकाराच्या घरावर छापा मारून सहा खरेदी खत, तीन कोरे चेक व एक हस्तलिखित डायरी जप्त करण्यात आली. ही कारवाई तालुक्यातील खंडाळा येथे गुरुवारी (दि. ३) सकाळी सहकार विभागाने अजिंठा पोलिसांच्या मदतीने केली.

योगेश माधवराव चव्हाण (रा. खंडाळा) असे छापा मारण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तालुक्यातील पिरोळा व पिंपळदरी येथील दोन महिलांनी योगेश चव्हाण यांच्या विरोधात सिल्लोड येथील सहकार कार्यालयात तक्रार केली होती. तक्रारकर्त्या महिलांनी आम्ही योगेश चव्हाण यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.

तर त्या बदल्यात आम्ही शेती गहाण ठेवली होती, अशी तक्रार दिलेली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाचे सहकार अधिकारी (श्रेणी - २) यशवंता देवकर, सहकार अधिकारी (श्रेणी- १) प्रांजल अंभोरे, प्रमुख लिपिक अब्दुल वाहिद, प्रमोद सावित्रे व अजिंठा ठाण्याचे दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी गुरुवारी छापा मारला. यात घराची झाडाझडती घेतली असता सहा वेगवेगळे खरेदी खत, तीन कोरे चेक व एक हस्तलिखित डायरी मिळून आली. सहाकार विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खरेदी खत, चेक व डायरी जप्त करीत पंचनामा केला.

दरम्यान या संदर्भात योगेश चव्हाण यांनी अद्याप आपला जबाब नोंदवलेला नाही. त्यांच्या जबाबानंतरच या प्रकरणातील सत्यता समोर येणार असल्याची माहिती सहकार अधिकारी यशवंता देवकर यांनी दिली.

गावात खळबळ

अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंडाळा गाव असून अचानक सहकार विभागाने पोलिसांच्या मदतीने छापा मारल्याने गावात एकच खळबळ उडाली. तर सहा वेगवेगळे खरेदी खत, तीन कोरे चेक व एक हस्तलिखित डायरी मिळाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. या प्रकरणाच्या पुढील चौकशीनंतरच यातील खरे-खोटे समोर येणार असल्याचे सहकार विभागाने म्हटले आहे-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news