Defense Career Academy : डिफेन्स करिअर ॲकॅडमीला संरक्षण मंत्रालयाची मान्यता File Photo
छत्रपती संभाजीनगर

Defense Career Academy : डिफेन्स करिअर ॲकॅडमीला संरक्षण मंत्रालयाची मान्यता

डिफेन्स करिअर अॅकॅडमीला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय आणि सैनिकी स्कूल सोसायटीकडून केंद्रीय सैनिकी शाळा म्हणून अधिकृत मान्यता मिळाली.

पुढारी वृत्तसेवा

Approval of Defense Career Academy by Ministry of Defence

छत्रपती संभाजीनगर :

महाराष्ट्रातील अग्रगण्य सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अॅकॅडमीला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय आणि सैनिकी स्कूल सोसायटीकडून केंद्रीय सैनिकी शाळा म्हणून अधिकृत मान्यता मिळाली.

यामुळे ही संस्था आता केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत PPP (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर चालणाऱ्या देशभरातील १०० नव्या सैनिकी शाळांपैकी एक ठरली आहे. ही मान्यता मिळालेली डीसीए ही मराठवाड्यातील अत्यल्प शाळांपैकी एक आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून डिफेन्स करिअर अॅकॅडमीने विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रभक्ती, नेतृत्वगुण आणि धाडसाचे मूल्य रुजवत हजारो विद्यार्थ्यांना लष्कर, नौदल आणि हवाई दलात अधिकारी बनवले आहे. आतापर्यंत १७२३ इंजिनिअर्स, ४७डॉक्टर्स आणि असंख्य जवान घडवले गेले आहेत.

संस्थेचे संचालक तथा डिफेन्स कोच डॉ. केदार राहाणे यांनी ही मान्यता म्हणजे 'भारत सरकारचा आमच्या कर्तृत्वावर ठेवलेला विश्वास' असे सांगत ही संस्था शिक्षणपेक्षा जास्त, एक राष्ट्रीय मिशन असल्याचे अधोरेखित केले.

आता डीसीएमध्ये प्रवेश अखिल भारतीय सैनिकी शाळा निवड परीक्षेद्वारेच होणार असून, महाराष्ट्रासह देशातील शिस्तप्रिय, देशसेवेची ऊर्मी असलेल्या विद्यार्थ्यांना नवे दालन खुले होणार आहे. या निर्णयाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष सोमिनाथ राहाणे, सचिव सचिन राहाणे, संचालिका उर्मिला राहाणे, प्राचार्य सुभाष धवन व सीईओ उद्धव टकले यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT