संत एकनाथ साखर कारखान्यावर प्रशासक नियुक्त करा : आ. भुमरे file photo
छत्रपती संभाजीनगर

संत एकनाथ साखर कारखान्यावर प्रशासक नियुक्त करा : आ. भुमरे

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा सभागृहात लक्षवेधी प्रश्न मांडून एकनाथ कारखान्यावर प्रशासक नियुक्त करावा, करार रद्द करण्याच्या कारवाईला विलंब लावणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Appoint an Administrator for Sant Eknath Sugar Factory: MLA Bhumre

पैठण, पुढारी वृत्तसेवा संत एकनाथ सहकारी साखर कारखाना करारावर चालविणारे सचिन घायळ शुगर मिल या प्रायव्हेट कंपनीने नियमाचे उल्लंघन केल्याचे गुरुवारी (दि.१२) आमदार विलास भुमरे यांनी म्हटले आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा सभागृहात लक्षवेधी प्रश्न मांडून एकनाथ कारखान्यावर प्रशासक नियुक्त करावा, करार रद्द करण्याच्या कारवाईला विलंब लावणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.

संत एकनाथ साखर कारखान्याची मालमत्ता बुलढाणा अर्बन बँकेत गहाण ठेवून तीस कोटी रुपये कर्ज उचलून १६ कोटी रुपये हडप केल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संत एकनाथ कारखाना चालविणाऱ्या सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कामकाजाविषयी आमदार विलास भुमरे यांनी गुरुवारी विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला.

कारखान्यावर प्रशासक नियुक्त करून कारवाईला विलंब लावणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लक्षवेधी स्वरूपात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे मांडली. दरम्यान, कारखान्याच्या कामगारांनी वेतन थकीत ठेवल्याप्रकरणी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांचे वेतन वसूल करण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने एकनाथ साखर कारखान्याच्या दोनाखर गोडाऊनला सील लावण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.

आर्थिक गुन्हे शाखा पथकाकडून झाडाझडती

संत एकनाथ कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेणारे सचिन घायल शुगर प्रा. लि. कंपनी विरुद्ध बुलढाणा अर्बन को. क्रे. सोसायटीच्यावतीने पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा स्वतंत्र तपास पदकाचे पोलिस उपनिरीक्षक मधुकर मोरे, पोकॉ नीलेश गायकवाड, राजेंद्र बोरसे, गणेश पंडुरे, आजिनाथ तिडके यांच्यासह मोरे यांनी गुरुवारी (दि.१२) संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयातील महत्त्वाचे संगणक, विविध अभिलेख दस्तावेजांची तपासणी करून ते जप्त केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT