अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला राजीनाम्याचा इशारा

एमडींच्या मनमानीने महामंडळच अडचणीत; सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

Annasaheb Patil Corporation Chairman Narendra Patil has threatened to resign

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कारभारावरून अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला असून, व्यवस्थापकीय संचालक विजयसिंग देशमुख यांच्या मनमानी काराभारामुळे महामंडळच अडचणीत आले असल्याचा गंभीर आरोप केला. यावरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासह कर्ज योजनांच्या अंमलबजावणीत लादण्यात आलेल्या अटींमुळे मराठा समाजातील पात्र युवक लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शासनाविरोधात नाराजी वाढत असल्याचा आरोपही पाटील यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कारभारावरून अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. व्यवस्थापकीय संचालक विजयसिंग देशमुख यांच्या कार्यपध्दतीमुळे महामंडळच अडचणीत आले असून, त्यांच्या कारभारामुळे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला.

कर्ज योजनांच्या अंमलबजावणीत लादण्यात आलेल्या अटींमुळे मराठा समाजातील पात्र युवक लाभापासून वंचित राहत असून, त्यामुळे शासनाविरोधात नाराजी वाढत असल्याचा आरोपही त्यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

यावेळी पाटील म्हणाले, कर्ज मंजुरीसाठी प्रमाणपत्र देताना आणि कर्ज वितरणाच्या प्रक्रियेत मूळ शासन निर्णयात नसलेल्या अटी-शर्ती लादण्यात आल्या. उत्पन्नाची अट घालण्यात आल्याने अनेक पात्र युवकांना कर्ज मिळू शकले नाही. २०२४-२५ या कालावधीत अनेक प्रमाणपत्रेही रद्द करण्यात आल्याने लाभार्थीचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. या निर्णयामुळे शासनाची प्रतिमा मलिन होत असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे सरकारबद्दल समाजात रोष निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षपद केवळ शोभेचे

अध्यक्षपद केवळ शोभेचे राहिले असून, अधिकारच नसतील तर हे पद ठेवून काय उपयोग, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास अध्यक्षपदाचा फेरविचार करावा लागेल, असे संकेत देतानाच कर्ज प्रक्रियेतील अडथळे दूर करून पात्र लाभार्थीना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT